ETV Bharat / state

Aspiring candidates : ओबीसी आरक्षणामुळे इच्छुक उमेदवार वेट अँड वॉच च्या भूमिकेत - due to OBC reservation

मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण जाहीर झाली आहे. त्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सूर करणे अपेक्षित होते. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय लागतो याची धाकधूक (due to OBC reservation) असल्याने अद्याप इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली नाही ते वेट अँड वॉच च्या भूमिकेत (Aspiring candidates in the role of wait and watch ) आहेत .

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jul 10, 2022, 4:39 PM IST

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporation) कार्यकाळ ७ मार्च २०२२ मध्ये संपला आहे. पालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये अपेक्षित होती. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली. दरम्यान राज्य सरकारने पालिकेतील २२७ प्रभागांच्या संख्येत ९ ने वाढ करून २३६ केली आहे. निवडणूक विभागाच्या आदेशाने प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण लॉटरी काढण्यात आली आहे. २३६ पैकी ५० टक्के प्रभाग महिलांसाठी, १५ प्रभाग अनुसूचित जाती व २ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसीसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आलेले नाहीत. ओबीसींच्या ६१ जागा खुल्या करण्यात आल्या आहेत.

वेट ऍण्ड वॉच ची भूमिका : ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने बांठिया आयोग नियुक्त केला आहे. या आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचा इंपेरियल डेटा गोळा केला जात आहे. हा डेटा सर्वोच्च न्य्यायालयात सादर केल्यास ओबीसींना आरक्षण दिले जाईल अशी शक्यता आहे. ओबीसींना आरक्षण दिल्यास अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे प्रभाग आरक्षण वगळता इतर प्रभागांमध्ये पुन्हा लॉटरी काढली जाणार आहे. असे झाल्यास सध्या जाहीर केलेले आरक्षित प्रभाग पुन्हा बदलणार आहेत. सध्यातरी कोणी रिस्क घ्यायला तयार नाहीत. सर्वच इच्छुक आणि माजी नगरसेवक ओबीसी आरक्षणाची वाट बघत आहे. त्या लॉटरीनंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने इच्छुकांनी वेट ऍण्ड वॉचची भूमिका (Aspiring candidates in the role of wait and watch ) स्वीकारली आहे अशी माहिती जेष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.

निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार होती. कोरोनामुळे ती पुढे ढकलली आहे. ही निवडणूक येत्या सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान होईल अशी शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पालिकेने मतदार याद्या, लागणारे कर्मचारी अधिकारी, वाहने, पोलिंग बूथ किती असतील आदी सर्वांची तयारी झाली आहे. निवडणूक कधीही झाली तरी आम्ही सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.