ETV Bharat / state

५० वर्षांच्या लढ्याला यश.. पाकिस्तानी नागरिकाला अखेर मिळाले भारतीय नागरिकत्व - family

आसिफ कराडीया यांचे वंशज हे भारतीय होते मात्र १९४७ च्या फाळणीनंतर कराडीया यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. पण आसिफ कराडीया यांनी काही वर्षातच पुन्हा भारतात येऊन मुंबईत राहण्यास सुरवात केली होती

आसिफ कराडीया यांना मिळाले भारतीय नागरिकत्व
author img

By

Published : Apr 5, 2019, 2:56 PM IST

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे कायदेशीर लढा देणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आसिफ कराडीया यांना आता भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे.

आसिफ कराडीया यांचे वंशज हे भारतीय होते मात्र १९४७ च्या फाळणीनंतर कराडीया यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. पण आसिफ कराडीया यांनी काही वर्षातच पुन्हा भारतात येऊन मुंबईत राहण्यास सुरवात केली होती. पत्नी, तीन मुले असा आसिफ यांचे कुटुंब आहे. पण प्रदीर्घ व्हिसाची मुदत संपल्यावर आसिफ कराडीया यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी २०१६ साली आसिफ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपण गेली ५० वर्षे भारतात राहत असून भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करूनही त्यावर कुठलाही निर्णय होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

यावर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाने यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असता, केंद्रीय गृह मंत्रालयाने येत्या 10 दिवसात आसिफ कराडीया यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल असे सांगितले, त्यानुसार १ एप्रिल २०१९ ला केंद्रीय गृहखात्याकडून आसिफ अब्बास कराडीया यांना भारतीय नागतिकत्व बहाल करण्यात आले आहे.

Intro:मुंबई उच्च न्यायालयात भारतीय नागरिकत्व मिळावं म्हणून गेली अनेक वर्षे कायदेशीर लढा देणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आसिफ काराडीया यांना आता भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. Body:आसिफ कारडीया यांचे वंशज हे भारतीय होते मात्र फाळणीनंतर काराडीया यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. पण आसिफ काराडीया यांनी काही वर्षातच पुन्हा भारतात येऊन मुंबईत राहण्यास सुरवात केली होती. पत्नी , तीन मुले असा आसिफ यांचे कुटुंब आहे. पण प्रदीर्घ विजा ची मुदत संपल्यावर आसिफ काराडीया यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते, या वेळी 2016 साली आसिफ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपण गेली 50 वर्षे भारतात राहत असून भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करूनही त्यावर कुठलाही निर्णय होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.Conclusion:या वर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाने यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असता केंद्रीय गृह मंत्रालयाने यावर उत्तर देताना येत्या 10 दिवसात आसिफ काराडीया यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल असं सांगण्यात आले आहे. त्या नुसार 1एप्रिल 2019 के केंद्रीय गृहखात्याकडून आसिफ अब्बास कराडीया यांना भारतीय नागतिकत्व बहाल करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.