ETV Bharat / state

अरुण जेटलींच्या जाण्याने राजकारण आणि समाजकारणात पोकळी, राजकीय क्षेत्रातून हळहळ

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या जाण्याने राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.

author img

By

Published : Aug 24, 2019, 6:14 PM IST

Updated : Aug 24, 2019, 8:35 PM IST

अरुण जेटलींचे निधन

मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या जाण्याने राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले. जेटली यांनी एकाच वेळी कायदे आणि संविधानाचा अभ्यास केला. तर दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधात लढाई लढली. आयुष्यभर ते अतिशय निष्कलंक जीवन जगल्याचे म्हणत शेलार यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.

अरुण जेटली हे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सातत्याने पुढे राहणारे नेते होते. त्यांनी संविधानाच्या अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवले. अडचणीच्या परिस्थितीत योग्य कायदेशीर मार्ग ते काढत असल्याचे शेलार म्हणाले.

राजकारणातून समाजकारण करणारे नेते - तावडे
अरुण जेटली हे राजकारणातून समाजकारण करणारे नेते होते. तब्बेतीकडे दुर्लक्ष करुन ते सातत्याने काम करत राहिले. कोणतीही गोष्ट करताना ते वैचारीकतेने करायचे. कोणतीही गोष्ट ते सहजतेने पटवून द्यायचे असे म्हणत मंत्री विनोद तावडेंनी अरुण जेटलींना आदरांजली वाहिली. ते आमचे मार्गदर्श होते. देश बदलाच्या मार्गावर असताना जेटलींचे जाणं व्यक्तिगत नुकसानाबरोबर देशाचेही नुकसान असल्याचे तावडे म्हणाले.

जेटलींच्या जाण्यानं राजाकरणात पोकळी

अभ्यासपूर्ण विषय मांडण्यात ख्याती असणारे नेते - गिरीष बापट
अरुण जेटली हे अभ्यासपूर्ण विषय मांडण्यात ख्याती असणारे नेते होते अशा शब्दात पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी जेटलींना आदरांजली वाहिली. संसदेतील अनेक त्यांची भाषणे प्रेरणा देणारी असल्याचे बापट म्हणाले. अनेक माझा आणि त्यांचा ३० ते ३५ वर्षाचा संबंध होता. महाविद्यालाच्या निवडणुका जिंकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

जेटलींच्या जाण्यानं पक्षाला धक्का - माधव भंडारी

अरुण जेटली भाजपचे थिंक टँक होते. त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. विद्यार्थी दशेच्या काळात त्यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांची सत्ता हलवण्याचा प्रयत्न केला. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. ते पक्षाचे ऊर्जावान नेते होते.

विद्वत्ता असूनही नम्र असणारे व्यक्तिमत्व - चंद्रकांत पाटील
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतत्र माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धक्का बसला असून, भाजपला कोणाची नजर लागली का? असा प्रश्न पडतो अशा भावना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर या सारखे मोठे नेते गेल्याने पक्षाचा मोठं नुकसान झाले आहे. अरुण जेटलीमध्ये प्रचंड विद्वत्ता असूनही ते नम्र होते. पक्ष आणि देशाप्रती आदर या सगळ्या गोष्टी जेटलीमध्ये होत्या. इतर पक्षाच्या नेत्यांसोबत देखील जेटली यांचे चांगले संबंध होते.

जेटलींकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या - रावसाहेब दानवे
अरुण जेटलींकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. गेल्या २० वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत होतो. भाजपच्या उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे दानवे म्हणाले.

जेटलींनी राजकारणातली भाषा कधीच केली नाही - खासदार गोपाळ शेट्टी
भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनाने पक्षाचे अपरिमित नुकसान झाले आहे. एक बुद्धिमान नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजकारणातली भाषा कधीच केली नाही, ते तार्किक नेते होते, या शब्दात मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष खासदार गोपाळ शेट्टी यांनी जेटली यांनी आदरांजली वाहिली.

सर्वसमावेशक, मनमिळावू नेतृत्वाचा अस्त - मुनगंटीवार
सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या अरुण जेटलींच्या भुमिकेमुळे जीएसटीची अंमलबजावणी यशस्वी झाली. त्यांच्या निधनाने देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारं, मनमिळावू, मुत्सदी आणि प्रचंड विद्वान असं नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतलं आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

जेटलींच्या जाण्यानं देशाची मोठी हानी - मंत्री बबनराव लोणीकर
अरुण जेटलींच्या जाण्यानं भाजपचे तर नुकसान झालेच आहे, मात्र त्याचबरोबर देशाचेही मोठी हानी झाल्याचे वक्तव्य मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

अरुण जेटली यांच्या जाण्याने देशासह भाजपचे मोठे नुकसान - अनंत गीते
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राला विशेषतः भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का आहे. अरुण जेटली यांनी ५ वर्षात सरकार चालवताना महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी व देशाचे मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी दिली.

जेटलींच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दु:ख व्यक्त केले. जेटली यांच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेल नवी दिशा मिळाली, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाने कधीही भरुन न येईल, अशी देशाची मोठी हानी झाली आहे. राष्ट्र त्यांचे योगदान कधीही विसरणार नसल्याचे सावंत म्हणाले.

देश एका मोठ्या नेत्रुत्वाला मुकला - गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे
देश एका मोठ्या नेत्रुत्वाला मुकला आहे. जेटली देशातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांच्या निधनाची बातमी एकून तीव्र दु:ख होत आहे. गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख केले आहे. मी कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

जेटलींच्या निधनाने भाजपबरोबर देशाचे मोठे नुकसान - भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने भाजप बरोबर देशाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी दिली. भाजपला इथ पर्यंत अणण्यात जेटलींचा मोठा वाटा आहे. दोन वेळी अर्थमंत्री राहिलेल्या जेटलींनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.

Intro:अरुण जेटली यांनी अतिशय निष्कलंक जीवन जगले ; शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

mh-mum-01-ashishshelar-jetali-byte-7201153 ( mojoवर बाईट पाठवला आहे)

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे
की जाणं हे केवळ धक्का देणार नाही तर आज जे राजकीय आयुष्यामध्ये राजकारणात आणि समाजकारणात काम करतात त्यांच्यासाठी ही पोकळी निर्माण झाली आहे. जेटली यांनी एकाच वेळी कायदे आणि संविधान याचा अभ्यास, दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधात लढाई लढली आणि आयुष्यभर त्यांनी अतिशय निष्कलंक जीवन जगले अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

शेलार म्हणाले की, खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणामध्ये अतिशय निष्कलंक जीवन जगणे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सातत्याने पुढे राहणार ते नेते होते. संविधानाच्या अभ्यासामध्ये अतिशय प्रावीण्य मिळवणं आणि ज्यावेळेला अडचणीचा परिस्थिती राजकीय निर्माण होते त्यावेळी कायदेशीर मार्ग काढणे हे एका व्यक्तीमध्ये एवढे गुण असलेला नेता होणे नाही, त्यामुळे अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल माझ्याकडून, सरकारच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो.
Body:अरुण जेटली यांनी अतिशय निष्कलंक जीवन जगले ; शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रियाConclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.