ETV Bharat / state

POP Ganesha Murti : या वर्षीही पीओपीच्या गणेशमूर्तीस परवानगी द्या - आशिष शेलार

author img

By

Published : Jun 18, 2023, 5:24 PM IST

या वर्षीही पीओपीच्या गणेशमूर्तीस परवानगी द्या, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायला हवी, मुंबई महापालिकेने पीओपीवर घातलेली बंदी आम्हाला मान्य नसल्याची भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी घेतली आहे.

POP Ganesha Murti
POP Ganesha Murti

मुंबई : दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान पीओपी पासून बनवल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती हा चर्चेचा विषय राहिला आहे. या व्यवसायात कोटींची उलाढाल असून मराठी तरुणांना या निमित्ताने रोजगाराची संधी उपलब्ध होते. गणेशमूर्ती कारखान्यांचा उद्योग बंद करुन मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

७० ते हजार ८० हजार कोटीपर्यंत उलाढाल : यावेळी आशिष शेलार म्हणाले की, मूर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे. रोजगार निर्माण करणारे राज्यातले मोठे साधन आहे. पूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रातला निर्माण केलेल्या या मूर्तींच्या देवाण-घेवाणीमधून ७० ते ८० हजार कोटीपर्यंत उलाढाल होते. एवढे मोठे काम असलेली ही इंडस्ट्री एका निर्णयाकडे बोट दाखवून जर बंद करण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर आमचा विरोध आहे. पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो जनहिताचा नाही. महाराष्ट्र हिताचा नाही, देश हिताचाही नाही.

शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात : ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी पीओपीच्या मूर्तीसुद्धा शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात, पर्यावरण घातक न ठरतासुद्धा विसर्जन होऊ शकते. या गोष्टी समोर आणल्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा. विशेषतः मुंबई महानगरपालिकेने जे परिपत्रक काढले आहे की, चार फुटांच्या खालील मूर्ती ह्या शाडू मातीच्याच असाव्यात. हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पालिका आयुक्त उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. सकारात्मक चर्चा आहे, न्यायालयीन काही आदेश असले तरी या पद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे.

८० हजार कोटींच्या ठेवी : मराठी माणसाचा रोजगार कुठे बंद होता कामा नये, यासाठीच भूमिका घेऊन आम्ही चाललो आहोत, असे आमदार ॲड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका गेली २५ वर्षे मुंबईतील ३ हजार ५०० दशलक्ष लीटर सांडपाणी रोज समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न कराता सोडत आहे. त्या मुंबई महापालिकेला फक्त गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते. हे बोलण्याचा अधिकार आहे का? ८० हजार कोटींच्या ठेवी असताना का सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले नाहीत? असा सवाल यावेळी आमदार आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.