ETV Bharat / state

"ही तर टाटा, बिर्लाची सेना"; आशिष शेलारांची मुंबई महापालिका व शिवसेनेवर टीका - Ashish Shelar comment Mumbai mnc

टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटीची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने 'बीएसई' वर मात्र कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला, तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना? वा ! ही तर टाटा, बिर्लाची सेना, असे टीकास्त्र भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर डागले आहे.

Ashish Shelar comment Shiv Sena
आशिष शेलार टीका मुंबई महापालिका
author img

By

Published : Jan 4, 2021, 3:51 PM IST

मुंबई - टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटीची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने 'बीएसई' वर मात्र कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला, तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना? वा ! ही तर टाटा, बिर्लाची सेना, असे टीकास्त्र भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर डागले आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार

हेही वाचा - विलासकाकांच्या निधनाने लोकप्रिय, अनुभवी अन् निष्ठावंत नेतृत्व हरपले - थोरात

ताज हॉटेलला तब्बल ९ कोटी रुपये दंड माफ करणाऱ्या महापालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. गेल्या काही वर्षांत ताज हॉटेलने बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसेच अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण केले. त्यामुळे, महापालिकेने हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपये दंड ठोठावला होता. या पैकी हॉटेल ताजने ६६ लाख रुपये भरले आहेत. मात्र, आता महापालिकेने दंडमाफी करत या वादावर पडदा टाकला आहे.

महापालिका खर्चाचा हिशोब का देत नाही?

मुंबई महापालिका कोरोनावर 6 महिन्यात 1 हजार 600 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगते. पालिका अजून 400 कोटी हवेत, असे म्हणते. पण, झालेल्या खर्चाचा हिशोब का देत नाही? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या 1 हजार 600 कोटीच्या मंजुरीनंतर 400 कोटीचा प्रस्ताव आल्याने भाजपने हिशोब देण्याची मागणी केली, असे आशिष शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेने 1 हजार 600 कोटीचा हिशोब पारदर्शकपणे द्यावा, अशी मागणी आशिष शेलारांनी केली. मुंबईचा एक एक माणसाचा जीव वाचला पाहिजे, ही सत्य परिस्थिती आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळी झालेल्या खर्चाचा हिशोब मुंबई पालिका का देत नाही, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - अन् वरळी सी फेसवरील सिग्नल यंत्रणा 'चमकली'...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.