मुंबई - राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर हा राजकारणातील सगळ्यात मोठा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून उद्धव ठाकरे हे पुढील त्यांची भूमिका स्पष्ट करतील असे त्यांनी सांगतले.
आज सकाळी 8 वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
हेही वाचा - कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड
मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या निर्णयाबाबत अंधारात असल्याचंही दिसत आहे. सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते आहेत. त्यामुळे थेट अजित पवार यांनीही पाठिंबा दिला असावा, अशी चर्चा आहे. यावर शरद पवारांनी अजित पवारांच्या या पाठिंब्याला सहमती नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - फडणवीस-पवार यांच्या शपथविधीने राष्ट्रवादीचे नेते 'नॉट रिचेबल'