मुंबई - अरुण जेटली यांच्या माध्यमातून आपल्याला राजकीय गुरू भेटले. वेळोवेळी राजकीय जीवनात त्यांनी मोलाचा सल्ला दिला. तसेच अरुण जेटली यांचे मुंबई सोबत अतूट नाते होते. त्यामुळे मुंबईत त्यांचं स्मारक होणे गरजेचे होते, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. ते माजी केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गोपळ शेट्टी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते.
यावेळी पेडर रोड येथे असलेल्या फिल्म्स डिव्हिजन सभागृहामध्ये संबोधन करत असताना, आपल्या हस्ते अरुण जेटली यांच्या स्मारकाचे अनावरण होणे, हे आपल्यासाठी सौभाग्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहायाने हे स्मारक व्हायला मदत झाली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'वन नेशन वन टॅक्स'चे स्वप्न जेटली यांनी केले पूर्ण
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनीही अरुण जेटली यांच्या आठवणींना उजाळा दिला. अर्थमंत्री म्हणून देशाला दिशा देण्याचे काम अरुण जेटली यांनी केले होते. देशात जीएसटी लागू करून 'वन नेशन वन टॅक्स' स्वप्न अरुण जेटली यांनी पूर्ण केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या बाराशे कोटींचा मागणीचे स्वागत
या कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राज्याच्या विकासासाठी बाराशे कोटीच्या मागणी केली असेल तर आपण त्याचे स्वागत करतो, असे म्हणाले.
शहरी भागात वाढणाऱ्या नक्षलवादाकडे सरकारने लक्ष द्यावे
राज्यातील ग्रामीण भागात असलेला नक्षलवाद कमी झाला आहे. मात्र, शहरी भागात वाढत असलेल्या नक्षलवादाकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, असा सल्लाही फडणीस यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - मुंबई पालिका निवडणूक, काँग्रेस लढणार 227 जागा