ETV Bharat / state

अर्णब गोस्‍वामींनी मोबाईल वापरल्‍याची बाब समोर; तळोजा कारागृहात हलवले

अर्णब गोस्‍वामी यांना बुधवारी 4 नोव्‍हेंबरला अटक केल्‍यानंतर न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर रात्री उशिरा त्‍यांना न्‍यायालयीन कोठडीत पाठवण्‍यात आले. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अलिबाग नगरपालिका शाळा क्रमांक - 1 मधील तात्‍पुरत्‍या क्‍वारंटाइन तुरुंगात ठेवण्‍यात आले होते.

arnab goswami
अर्णब गोस्‍वामी
author img

By

Published : Nov 8, 2020, 9:08 PM IST

रायगड - अन्‍वय नाईक आत्‍महत्‍याप्रकरणी रिपब्लिक टीव्‍हीचे संपादक अर्णब गोस्‍वामी यांना अलिबागच्‍या क्‍वारंटाइन जेलमधून सुरक्षेच्‍या कारणास्‍तव तळोजा मध्‍यवर्ती कारागृहात हलवले असल्‍याचे सांगितले जात आहे. तरी याबाबत आता वेगळी कारणे पुढे येत आहेत. अर्णब गोस्‍वामी यांनी तुरुंगात असताना आपला मोबाईल फोन वापरल्‍याचे समोर आले आहे. तुरुंगात असताना त्‍यांच्‍याकडे फोन आला कसा? याची चौकशी आता सुरू आहे.

अर्णबकडे मोबाईल आला कसा -

अर्णब गोस्‍वामी यांना बुधवारी 4 नोव्‍हेंबरला अटक केल्‍यानंतर न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर रात्री उशिरा त्‍यांना न्‍यायालयीन कोठडीत पाठवण्‍यात आले. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अलिबाग नगरपालिका शाळा क्रमांक - 1 मधील तात्‍पुरत्‍या क्‍वारंटाइन तुरुंगात ठेवण्‍यात आले. त्‍यावेळी त्‍यांचा फोन काढून घेण्‍यात आला. त्‍यानंतर शुक्रवारी त्‍यांनी आपला फोन वापरल्‍याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी ते लाइव्‍ह असल्‍याचे सोशल मिडियावर दिसून आल्‍याने कारागृह प्रशासनाशी बोलून त्‍यांना तातडीने तळोजा मध्‍यवर्ती कारागृहात हलवण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. आता त्‍यांच्‍याकडे मोबाईल कसा आला? आता याची चौकशी सुरू असल्‍याचे तपास अधिकारी जमीर शेख यांनी सांगितले. तर अलिबाग कारागृहाचे अधिक्षक ए. टी. पाटील यांनीही त्‍याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा - अर्णब गोस्वामींच्या समर्थनात राम कदमांची खार ते सिद्धिविनायक पायी यात्रा

कारागृहाच्या सुरक्षेबाबत संशय -

क्‍वारंटाइन जेलमध्‍ये दुसरी व्‍यवस्‍था नसल्‍याने कारागृहाचा मोबाईल फोन कैद्यांना त्‍यांचे नातेवाईक व वकीलांशी बोलण्‍यासाठी उपलब्‍ध करून दिला जातो. मात्र, कैद्यांना त्‍यांचा मोबाईल फोन वापरता येत नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. अर्णब गोस्‍वामी यांनी मोबाइल वापल्‍याची बाब समोर आल्‍याने अलिबाग कारागृहाच्‍या सुरक्षिततेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाईलबाबत चौकशी सुरू -

कैद्यांना कोरोना काळात जेलचा मोबाईल वापरण्यास देण्यात येतो. अर्णब यालाही मोबाईल बोलण्यासाठी देण्यात आला होता. तो कोणाशी बोलला, किती वेळ बोलला, याची नोंद वहीत करण्यात आलेली आहे. त्याव्यतिरिक्त अर्णब याने मोबाईल वापरला असल्याची चौकशी सुरू झाली असून चौकशीत सगळी बाब समोर येईल, अशी माहिती अलिबाग कारागृहाचे अधीक्षक ए. टी. पाटील यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.