मुंबई : या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, यामुळे आता मुंबई पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव मोठी तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईत 4500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दहशतवादी आणि समाजविरोधी घटक हे ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट, एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात. त्यामुळे मानवी जीवन सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
सुरक्षेचा चोख बंदोबस्त : बीकेसी पोलीस ठाणे, अंधेरी पोलीस ठाणे, जोगेश्वरी पोलीस ठाणे आणि मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईटर, एअरक्राफ्ट मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. वाहतुकीच्या नियोजनात बदल पंतप्रधान मोदींच्या उद्या शहर दौऱ्यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूकुीच्या नियोजनात बदल केला आहे. दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत, पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी असणार आहे. एसआरपीएफच्या 4 तुकड्या, दंगल विरोधी पथक आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची प्रत्येकी 1 तुकडी तैनात केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
असा असेल कार्यक्रम : पंतप्रधान दौऱ्यात पहिल्यांदा एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण हा कार्यक्रम असणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या २० हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे उद्घाटन यावेळी करण्यात येईल. त्यासोबतच मुंबईतील ३ मोठ्या हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळाही पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडेल. शिवाय मुंबईतील महत्वकांशी असा प्रकल्प असलेल्या ४०० किमीच्या सीसी रोडच्या कामाचेही उद्घाटन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडणार आहे. शिवाय मुंबईतील फेरीवाल्यांसाठीच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत १० हजारांच्या धनादेशाचे वाटपही यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांची जाहीर सभा : पंतप्रधान वांद्रे येथील बीकेसी मैदानावर एक भव्य सभा घेणार आहेत. या भव्य सभेची जय्यत तयारी शिंदे फडवणीस सरकारकडून करण्यात आलेली आहे. जवळपास एक लाख नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेत सामील होतील अशी आसन व्यवस्था या सभेसाठी करण्यात आलेली आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा मंच तयार करण्यात आलेला आहे. केवळ ज्या मान्यवरांना स्टेजवर निमंत्रण असणार आहे. त्यांनाच स्टेजवर घेतले जाणार आहे. तर आमदार खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांसाठी स्टेजच्यासमोर आसनव्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यामागे सामान्य नागरिक बसतील अशी व्यवस्था या सभेसाठी करण्यात आलेली आहे. या सभेसाठी केल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
हेही वाचा : Modi Thackeray Posters : बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे मोदी झुकल्याचे पोस्टर मुंबईत झळकले