मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संभाव्य युतीवर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सोमवारी त्यांनी सांगितले की, राजकारणात चर्चा होतच राहतात. काही बातम्यांचा आनंद घेतला पाहिजे, असे ते माध्यमांशी बोलताना म्हटले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाजप राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या भेटीला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, जनता हे 'महागठबंधन' कधीच स्वीकारणार नाहीत. सर्व भ्रष्ट पक्ष एकमेकांची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनतेने असे 'महागठबंधन' कधीच स्वीकारले नाही, ते कधीच स्वीकारणार नाहीत. कारण त्यांची संपूर्ण ओळख कोणत्याही धोरण, नेत्या किंवा नेतृत्वाशिवाय आहे. ते (विरोधक) केवळ आपले पद टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
विरोधी पक्षांवरही साधला निशाणा : भ्रष्टाचार, तुरुंगात जाण्यापासून स्वतःला रोखा आणि राजकीय अस्तित्व टिकवून ठेवा, असेही मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तक्रार करणाऱ्या विरोधी पक्षांवरही त्यांनी निशाणा साधला. जेव्हा हे माफिया सर्वसामान्यांना, व्यावसायिकांना मारायचे, तेव्हा यातील एकाही नेत्याने कोणतेही वक्तव्य केले नाही. या माफियांना आधीच्या सरकारांकडून संरक्षण मिळायचे. हे सगळे नेते आता का विधाने करत आहेत, असा सवालही अनुराग ठाकूर यांनी केला.
यूपी सरकारवर निशाणा : गँगस्टरमधून राजकारणी बनलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना शनिवारी रात्री प्रयागराज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना तीन हल्लेखोरांनी हत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, अनेक विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला आहे. पालघर दौऱ्याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले की, महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी माझ्याकडे आहे. येत्या निवडणुकीत जनता भाजप -शिवसेना युतीला आशीर्वाद देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नागपुरमध्ये मार्च महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढती अश्लीलता आणि द्वेषपूर्ण भाषणाबद्दल संवाद साधला होता.