ETV Bharat / state

Look Back 2022 : महाराष्ट्रात नक्षलविरोधी कारवाया! वाचा, सरत्या वर्षातील खास रिपोर्ट - 15 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक

Look Back 2022 : नक्षलवाद हा शब्द ऐकला की डोळ्यापुढे हातात बंदूक घेतलेली, हिरवा पोशाख परिधान केलेला माणून समोर येतो. यामध्ये जग आपल्या पायाशी येईल अशी आपली कितीतरी दिवसांपासून समजूत करून घेत दिशाभूल झालेले हजारो तरुण-तरुणी या बेकायदेशीर चळवळीचे सैनिक म्हणून जंगलात भटकत आहेत. (Anti Naxalite Action 2022) दरम्यान, यामध्ये नक्षली चवळीत असलेल्या आणि संबंधीत काम करणाऱ्या महाराष्ट्रात 2022 या वर्षात किती कारवाया झाल्या हे सांगणारा हा ईटीव्ही भारतचा सरत्या वर्षाचा रिपोर्ट...

Anti Naxalite Action 2022
सरत्या वर्षातील नक्षलवादी कारवाया
author img

By

Published : Dec 19, 2022, 6:15 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:17 PM IST

मुंबई - Look Back 2022 : पश्चिम बंगालच्या नक्षलबारी येथे चारू मुजुमदार यांनी जमीनदारांच्या विरोधात संघर्ष उभा करून मोठे आंदोलन उदयास आणले. या आंदोलनात नक्षलबारीचे पीडित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. तिथूनच नक्षलवादी हा शब्द रूढ झाला. प्रारंभी साम्यवादाचा विचार मांडत जमीनदारांच्या विरोधात उभी ठाकलेली ही संघटना वेगळ्या मार्गावर जात राहिली आणि पुढे जाऊन तिचे स्वरूप बदलत गेले. पुढे या चळवळीने महाराष्ट्रात काही स्थानिक प्रश्न घेऊन प्रवेश केला. 80 च्या दशकात ही चळवळ गडचिरोली, गोंदिया आणि राज्याला लागलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पाय पसरायला लागली. त्याची सुरुवात शंकर अण्णा नावाच्या नक्षल्याने केली. (2022 Year Ender) गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात म्हणजे सिरोंचा आणि अहेरी भागात त्याने सुरुवातीला पाय ठेवला. त्याला सक्रिय मदत करणारे मोठे नेते आंध्रप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर कार्यरत होते. (Anti-Naxalite operations 2022 ) यात किशन जी, गणपती, तिरुपती यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. शंकर अण्णा चकमकीत ठार झाल्यानंतर सूरन्नाने सूत्रे हाती घेतली. आणि त्याला आणि चळवळीला मोठे करण्यासाठी किशन जीसह इतरही मोठे नेते आंध्रप्रदेशची सीमा ओलांडून महाराष्ट्रात आले. चळवळ पाय पसरत असतानाच (1990)च्या सुमारास नर्मदाक्का नावाच्या एका तरुण महिला नक्षलीने येथे प्रवेश केला. त्यानंतर सुरन्ना आणि नर्मदाक्काने झपाटल्यागत कामाला सुरुवात केली. त्यावेळी तेंदूपत्ता (ज्याला विडीपत्ता असेही म्हणतात) ठेकदारांकडून स्थानिक मजुरांना दिली जाणारी मजुरी अत्यल्प होती. सोबतच निरक्षर-निर्धन आदिवासींवर होणारे अत्याचार, हे दोन मुद्दे घेऊन ही चळवळ येथे सक्रिय झाली आहे.

महाराष्ट्रात (2022)मध्ये नक्षलविरोधी झालेल्या कारवाया खालीलप्रमाणे - 1) 8 ऑक्टोबर 2022 रोजी: गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियानात दोन कथित नक्षलवादी पकडले गेले, त्यांना पकडण्यासाठी नक्षलवादी जोडीवर 10 लाखांचे बक्षीस होते. जिल्ह्याच्या उत्तर भागात मोडीत काढलेल्या नक्षल चळवळीला पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नक्षल्यांच्या कंपनी १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर (पीपीसीएम) सनीराम याच्यासह आणखी एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. यामुळे उत्तर भागात नक्षल्यांना पुन्हा एक हादरा बसला. सनीराम याच्यावर ८ लाखांचे, तर सहकारी समुराम याच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात २ संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

2) 20 फेब्रुवारी 2022: गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात चार नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील दामरेचा जंगलात स्फोटक पुरवणाऱ्या चार आरोपींना अटक (Four accused arrested,) करण्यात आली. जंगलात छत्तीसगड राज्यात वायर बंडल स्फोटक पदार्थ व काही नक्षलवाद्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा हे समर्थक करत होते. सदर कारवाई अहेरी तालुक्यातील दामरेचा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली. चार नक्षलसमर्थकांकडून दहा नग कार्डेक्स वायरचे बंडल नेले जात होते. हे बंडल साडेतीन हजार मीटर लांबीचे आहे. हे साहित्य जप्त करण्यात आले. करीमनगर जिल्ह्यातील आसिफनगरचे राजू सल्ला, अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा येथील काशिनाथ गावंडे, साधू तलांडी, करीमनगर जिल्ह्यातील आसिफनगरचा मोहम्मद शादुल्ला व अहेरी येथील सिनू मुल्ला गावडे या आरोपींना अटक करण्यात आली.

3) 21 एप्रिल 2022 : रोजी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 18 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या चार नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली. याचवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना अटक केली होती. यात एक महिला नक्षलीचाही समावेश होता. यातील दोन जहाल नक्षलवाद्यांवर 14 लाखांचे तर उर्वरित दोघांवर 4 लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत 15 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक केली आहे. नालासोपाऱ्यातून त्याला अटक करण्यात आली. हुलाश यादव, असे या 45 वर्षीय अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच माओवादी संघटनेचा सदस्य आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर 15 लाखांचे बक्षीस ठेवले होते.

4) 25 मे 2022 : राज्य सरकारच्या ‘आत्मसमर्पण-सह-पुनर्वसन धोरणा’अंतर्गत दोन कट्टर नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली, ज्यांच्यावर प्रत्येकी 6 लाख रुपयांचे इनाम होते. गडचिरोली जिल्हा पोलीस दलासमोर सहा लाखांचे बक्षीस असलेल्या एरिया अ‍ॅक्शन टीमचा सदस्य ऊंगा उर्फ लक्ष्छुराम पांडू वड्डे, बाली उर्फ कविता बुकलू पुंगाटी व कुमली उर्फ शांती शंकर कवडो या तीन नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. कधी काळी वैचारिक चळवळ म्हणून डंका पिटणाऱ्या नक्षली नेत्यांनीच खंडणीखोरी सुरू केल्याने जीवाच्या भीतीने नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलातर्फे नवजीवन योजना राबविण्यात आल्याने नक्षल सदस्यांना आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहन मिळाले. तसेच, मागील वष्रेभरात झालेल्याआत्मसमर्पणाबरोबरच चालू वर्षीही ओघ सुरू आहे.

5) 29 जुलै 2022 : नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात सरकारी एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली. पोलिसाची गस्त सुरू असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे बॅनर लावताना हे तिघे सापडले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केद्राच्या एमबीबीएस डॉक्टर पवन उईकेचा समावेश आहे. डॉक्टरसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6) 29 ऑगस्ट 2022: महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या लाहेरी हद्दीतील जंगलातून तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. लाहेरी जिल्हा पोलीस दलाच्या विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या तिघांवर एकूण दहा लाख रुपयांचे बक्षिस होते. रमेश पल्लो, तानी पुंगाटी, अर्जुन नरोटे अशी या तिघांची नावे आहेत.

7) 21 सप्टेंबर 2022 : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. याच अनुषंगाने चार लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर (वय २६), रा. तिम्मा जवेली, ता. एटापल्ली आणि दोन लाखांचे बक्षीस असलेली रोशनी उर्फ ईरपे नरंगो पल्लो (वय ३०) रा. डांडीमरका, पो. आरेच्छा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) या दोघांनी आत्मसमर्पण केले.

8) 21 सप्टेंबर 2022 : गडचिरोली जिल्ह्यात सहा लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांनी आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या मध्ये जहाल माओवादी अनिल उर्फ रामसाय आणि रोशनी इरये या दोघांचा समावेश आहे. अनिलने कसनसुर दलममध्ये काम केले आहे. पोलीस दलावर भूसुरंगस्फोटाद्वारे आणि गोळीबार करून हल्ला करणे, अशा गंभीर घटनांमध्ये तो सहभागी होता. अनिलने केलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक जवान शहीद तर दहा जवान जखमी झाले होते. तर रोशनी उर्फ इरयीने दलम सदस्य ते एसीएम आणि उपकमांडर पदावर काम केले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यासह पोलिसदलावर हल्लाच्या काही गंभीर घटनांमध्ये तिचा समावेश होता. अनिलवर चार लाखाचे तर रोशनीवर दोन लाखाचे बक्षीस आहे.

9) 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीत नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसुल करणाऱ्या 10 नक्षल समर्थकांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली. नक्षल सप्ताह दरम्यान, नक्षलवादी शासन विरोधी योजना आखुन खंडणी वसुल करणे, रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. हीच संधी साधून नक्षल समर्थक नक्षलवाद्यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेची फसवणूक करतात.

10 )14 डिसेंबर 2022 : बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या अरुण भेलके याला विशेष न्यायाधीश एस. आर .नावंदर यांनी आठ वर्षे सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. चाकण परिसरातून २०१४ मध्ये अरुण भेलके उर्फ आदित्य पाटील आणि त्याची पत्नी कांचन उर्फ सोनाली पाटील (वय ३३) यांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. भेलके दाम्पत्य मूळचे चंद्रपूरचे आहे. दोघांच्या विरोधात बेकायदा प्रतिबंधक हालचाल (यूएपीए) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून भेलके येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची पत्नी कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रुग्णालयात मृत्यू झाला. कांचनला ह्दयविकाराचा त्रास होता.

Last Updated : Dec 22, 2022, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.