मुंबई - सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगर पालिकेचा कार्यकारी अभियंता अनिल पाटील यास अटक करण्यात आली. बुधवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांच्या तपासात आतापर्यंत २ जणांना अटक झाली होती. ज्यामध्ये ऑडीटर नितीनकुमार देसाई याच्यासह सहायक अभियंता एस.एफ.कुलकुलते या दोघांना अटक झाली होती. त्यानंतर अनिल पाटील या तिसऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सीएसएमटी पूल कोसळल्याने १४ मार्चला ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३१ जण जखमी झाले होते. पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कल्पेबाल होमिसईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आला असून या प्रकरणी, या पुलाचे ऑडिट करणाऱ्या नीरजकुमार देसाई या स्ट्रक्चरल ऑडिटरला अटक केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३ जणांना अटक केली आहे. यामध्ये मुंबईमहानगर पालिकेच्या २ अभियंत्यांचा समावेश आहे. सहायक अभियंता कळकुलते व अनिल पाटील यांच्यावर मिळालेल्या ऑडिटच्या अहवालाचे निरीक्षण करण्याची जवाबदारी होती.