मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई (Anil Parab Resort Action) होणार असल्याचा खात्रीलायक दावा भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya Claims vs Anil Parab Resort) यांनी केला आहे.
अनिल परब हे आता वाचू शकणार नाहीत, त्यांचा खोटेपणा उघड होणार आहे, असेही सोमय्या म्हणाले. या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. Latest news from Mumbai,
नऊ सदस्यीय सनियंत्रण समिती - दरम्यान या प्रकरणी नऊ सदस्यांची सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती याबाबत लवकरच कार्यवाही सुरू करीत असून पुढच्या आठवड्यात रिसॉर्ट तोडण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे.
त्यामुळे दापोली येथील अनिल परब यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट आणि सिकॉज रिसॉर्ट हे दोन्ही येत्या 90 दिवसात जमीन दोस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.