मुंबई : कोकणच्या दापोली येथे साई रिसॉर्ट हॉटेल हे बेकायदा रीतीने बांधकाम केले आहे.असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.त्याबाबत ईडी कडे तक्रार देखील केली होती. ईडी ने त्याची दखल घेत साई रिसॉर्ट हॉटेल प्रकरणी कारवाई देखील केली. याप्रकरणात ईडीची केस रद्द व्हावी यासाठी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ह्या बाबत तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती त्यांचे वकील अमित देसाई यांनी केली आहे.
तातडीने सुनावणी घेण्याची विनंती : अनिल परब यांच्यावर विविध प्रकारचे आरोप ठेवून अंमलबजावणी संचलनालयाने कोणत्याही जबरदस्ती कारवाई करू नये आणि त्या आणि त्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी वकील व अमित देसाई यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केलेली आहे.
परबांची उच्च न्यायालयात धाव : या संदर्भातली पार्श्वभूमी अशी आहे की, प्राप्तिकर विभागाने चार वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी अनिल परब यांचा संबंध असल्याचा संशय आधारे छापे टाकले होते. त्यासंदर्भातली पूर्ण चौकशी झालेली नाही आता साई रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने दापोली येथील साई हॉटेल हे बांधकाम नियमाला धरून नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्याकडे त्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. त्याबद्दल त्यांना तपासणी करायची आहे, असा आरोप आहे. या आरोपाच्या अनुषंगाने जबरदस्ती कोणतीही कारवाई केली जाऊ नये. म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनिल परब यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.
काय आहे प्रकरण? : दापोली येथील साई रिसॉर्ट हे सहा कोटी रुपयांमध्ये बांधून झालेले होते. त्यानंतर ते हॉटेल 2020 या वर्षी 11 कोटी रुपयांना विकण्यात आले होते. ज्या हॉटेल बाबत अंमलबजावणी संचलनालयाने आरोप ठेवलेला आहे. त्या हॉटेलच्या संदर्भात याची किंमत हा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे की कदम आणि अनिल परब यांनी कोणीही हॉटेल बांधकामासाठी कोणत्याही प्रकारे स्वतःचा पैसा गुंतवला नाही किंवा खर्च केला नाही. त्यामुळे या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना विविध प्रकारे आरोप ठेवले जात आहे. त्या आधारे जबरदस्ती कारवाई केली जाऊ शकते आणि म्हणून या कारवाईपासून संरक्षण मिळायला हवे त्यासाठी अनिल परब यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : ED summons to Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार? ईडीने बजावले समन्स