मुंबई - एसटी संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर उद्या (बुधवारी) सकाळी तोडगा निघणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा अंतरिम नवा प्रस्ताव सादर केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांची सह्याद्री अतिथीगृहात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. एसटी कर्मचारी, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, संयुक्त कृती समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
एसटी संपावर निघणार तोडगा? महामंडळाचे नुकसान थांबवावेबैठकीत आज सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान समितीचा निर्णय होईपर्यत पगारात अंतरिम वाढ देण्याचा नवा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला यासंदर्भात माहिती दिली. उद्या ११ वाजता पुन्हा बैठक बोलावली असून यावेळी तोडगा निघेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. तसेच अंतरिम वेतनवाढ दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि राज्यातील जनतेचे होणारे हाल थांबवावे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे विलनीकरण करायचे की नाही त्याबाबतचा निर्णय अहवाल आल्यानंतर होईलच. संप मागे घेतल्यास कर्मचाऱ्यांचे आणि एसटी महामंडळाचे होणारे नुकसान थांबेल, असे मंत्री परब म्हणाले.
संपाची धार तीव्रएसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन पुकारले आहे. राज्य शासनात एसटीचे विलीनीकरण करावे, ही आग्रही मागणी आहे. विलीनीकरणच्या प्रस्तावावर न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. समितीला १२ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एसटीचे विलनीकरण करण्यासंदर्भातच्या अहवालावर काम सुरु आहे. न्यायालयाने निर्णय होईपर्यंत संप मागे घेण्याची सूचना दिली. तरीही कर्मचारी संपावर ठाम राहिले. भाजपने संपाला पाठिंबा देत, संपाची तीव्र केली. अनेक संघटनांनी संपाचे समर्थन करत, रस्त्यावर उतरल्या आहेत. संप यामुळे अद्याप मिटलेला नाही.
हेही वाचा - ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण