मुंबई: निलंबित एपीआय सचिन वाझेने उलटतपासणी वेळी चांदीवाल आयोगाला सांगितले होते की अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले न्हवते, मात्र आता त्याने केलेल्या अर्जात हो मला देशमुखणी वसुलीचे आदेश दिले होते असे उत्तर नोंदवण्याची मागणी केली. वाझेने अर्जात असही म्हटले आहे की, देशमुखांच्या सहकाऱ्यांनी मला वसुलीसांदर्भात सूचना केल्या होत्या. तसे आज चांदीवाल आयोगाला दिलेल्या पत्रांत त्यांनी म्हटले आहे मात्र वाझेंचा अर्ज चांदीवाल आयोगाने आज फेटाळून लावला आहे.
सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर आज अर्ज केला आहे. त्यांनी म्हणले आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख पॉवरफुल आहेत मी त्यांचे नावं घेणार नाही, मला अन् माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. मला तळोजा जेलमध्ये ठेवल्यापासून मला गरजेच्या बेसिक मेडिकल गोष्टी पुरवल्या जात नाहीत. मला गोरेगावच्या केसमध्ये गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. देशमुख हे पावरफुल व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही कारण मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझं अँजिओप्लास्टी ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा मला बेसिक मेडिकल ट्रीटमेंट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीर सिंग यांना खोट्या खडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. मला आणि परमबीर सिंग यांना खोट्या खडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं असाही आरोप वाझेने वाझेने चांदीवाल आयोगासमोर एक अर्ज करून केला. पण आयोगाने वाझेचा अर्ज फेटाळून लावला आहे.
मंगळवारी अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाकडे एटीएसच्या अहवालाची मागणी केली. एटीएसच्या अहवालात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच एटीएसने स्फोटके प्रकरणात मनसुख हिरेन प्रकरणातील 800 पानी अहवाल चांदीवाल आयोगासमोर सादर केला आहे.