ETV Bharat / state

Antilia Explosive Case : एटीएस अहवालाच्या प्रती देण्याची अनिल देशमुख यांची आयोगाला विनंती - Chandiwal Commission

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) आज चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) हजर झाले. यावेळी त्यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणात ( Antilia Explosive Case) एटीएसने दाखल केलेल्या अहवालाच्या प्रती देण्याची विनंती (to provide a copy of the ATS report) केली. तसेच या प्रकरणी एटीएसने केलेल्या तपासाचा अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंतीही केली. यातून परमरबीर सिंग यांचे 'परम सत्य' उघड होणार, असा दावा देशमुख यांनी चांदिवाल आयोगासमोर केला आहे.

Former Home Minister Anil Deshmukh
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Feb 8, 2022, 6:31 PM IST

मुंबई: एटीएसच्या तपास अहवालातून परमबीरचे 'परम-सत्य' बाहेर येईल असे अनिल देशमुख यांनी (Former Home Minister Anil Deshmukh) चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) सांगितले होते. या पार्श्वभूमीवर या अहवालात काय नमूद केले आहे याबाबत उत्सुकता आहे. परमबिर हेच मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून चांदिवाल आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. एटीएसने अँटिलिया प्रकरण (Antilia Explosive Case) आणि मनसुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बरेच पुरावे गोळा केले होते. देशमुख यांनी आयोगाला हे अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली होती त्यानंतर आज एटीएसने 1000 पानांचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सुपूर्द केली आहे.

अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचे मास्टरमाईंड माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हेच आहेत. त्यांनी ईडीच्या आरोपपत्रात या जबाबाचा उल्लेख केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर आपण नैतिकता म्हणून राजीनामा दिला असेही देशमुख यांनी सांगितल्याचे ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. स्फोटकं ठेवल्याप्रकरणी माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.