ETV Bharat / state

अनिल देशमुख दिल्लीला रवाना; ED च्या कारवाईविरोधात Supreme Court मध्ये जाणार! - Anil deshmukh delhi visit

माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ED कडून त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ते कायदेविषयक सल्ला घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच संदर्भात ईडीने त्यांना समन्सही बजावले आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Jul 3, 2021, 9:59 AM IST

Updated : Jul 3, 2021, 11:16 AM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ED कडून त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ते कायदेविषयक सल्ला घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच संदर्भात ईडीने त्यांना समन्सही बजावले आहे. दरम्यान, या संदर्भात देशमुखांनी ईडीकडे गुन्ह्यांची कागदपत्रेही मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याने देशमुख शनिवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत.

५ जुलैला ईडी समोर होणार हजर
येत्या ५ जुलैला ईडीने अनिल देशमुखांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यांना ईडीकडून तिसरा समन्स मिळाला असून, ते कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. याआधी ईडीने समन्स बजावून देखील देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. आता या प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देशमुख यांनी काही वेळ द्या, असे आर्जव ट्विटरवर केले होते.

याआधी ईडीने केली दोनदा छापेमारी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचा आरोप लावला होता. तेव्हापासून ते ईडीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी दोनवेळा छापेमारी केली आहे. तसेच सीबीआयने त्यांची एकदा चौकशी देखील केली आहे. तर ईडीच्या छापेमारी दरम्यान अनिल देशमुख त्यांच्या वरळीतील निवासस्थानी स्वत: हजर देखील होते. दरम्यान याच प्रकरणात अनिल देशमुख यांना दोन वेळा ईडीने समन्स देखील पाठवला आहे.

हेही वाचा - मोठी कारवाई! जेएनपीटी बंदरातून तब्बल 300 कोटींचे हेरॉईन जप्त

Last Updated : Jul 3, 2021, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.