ETV Bharat / state

Bombay Sessions Court : अनिल देशमुख 18 जूनपर्यंत देशात कुठेही फिरू शकतात - मुंबई सत्र न्यायालय - Anil Deshmukh

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटीच्या आर्थिक व्यवहारा प्रकरणी आरोप ठेवून त्यांना तुरुंगवास घडवला होता. त्या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जामिनानंतर मुंबई सोडून त्यांना इतरत्र कुठेही जाता येणार नाही. कारण मुंबई सत्र न्यायालयाने चौकशी सुरू असेपर्यंत मुंबईसह देशात कुठेही त्यांना जाता येणार नाही, अशी देखील बंदी घातली होती. मात्र आता सत्र न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. 18 जून 2023 पर्यंत ते आता देशात कुठेही फिरू शकतात. त्यांच्या प्रवासावर आता तोपर्यंत बंधन नाही.

Bombay Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Apr 25, 2023, 2:54 PM IST

Updated : Apr 25, 2023, 3:48 PM IST

मुंबई : माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप असल्यामुळे तसेच त्यांना या आरोपा प्रकरणी अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते .तरी अद्याप सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी झालेली नाही. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे हा सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याची देखील चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनिल देशमुख यांना देखील मुंबई सोडून इतरत्र कुठेही जाता येणार नाही अशा प्रकारची ही बंदी घातली होती.

18 जूनपर्यंत ते देशात फिरायला मुक्त : न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांसमोर या प्रकरणी अनिल देशमुख यांना मुंबई आणि इतरत्र ठिकाणी कामकाजासाठी जाण्याबाबत अनुमती मिळावी म्हणून अर्ज केला होता. स्वतः अंमलबजावणी संचनालय यांच्या मागणीनुसार चौकशी होईपर्यंत मुंबई आणि मुंबईच्या बाहेर त्यांना इतरत्र कुठे जाऊ देता कामा नये, अशा स्वरूपाची मागणी केली होती. परंतु आता अनिल देशमुख यांच्या मागणीवर न्यायालयाने विचार करत त्यांना मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देशात कुठेही जाता येईल, असा निर्देश दिला. मात्र यामध्ये एक महत्त्वाची अट घातली. ती म्हणजे फक्त पुढील 18 जूनपर्यंत ते देशात फिरायला मुक्त राहील, असे न्यायमूर्ती रोकडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या कामासाठी जाण्याची विनंती : अनिल देशमुख यांना शंभर कोटीच्या आर्थिक व्यवहारा प्रकरणी आरोप ठेवून त्यांना तुरुंगवास घडवला होता. न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केल्यानंतर देशात आणि मुंबईत चौकशी सुरू असेपर्यंत कुठेही जाण्यास सक्त मनाई केली होती. परंतु या संदर्भात विविध कामकाज आणि नातेवाईकांच्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी त्यांना जाणे अगत्याचे असल्याचे त्यांनी विनंती अर्जात नमूद केले. त्यामुळे न्यायालयाने किमान दीड महिनाभर तरी त्यांची देशात फिरण्यासाठीची मनाई उठवलेली आहे.

हेही वाचा : Eknath Shindes leave News : मुख्यमंत्री पदाचा कारभार पुन्हा फडणवीस यांच्याकडे... जाणून घ्या कारण

Last Updated : Apr 25, 2023, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.