मुंबई - अंगणेवाडीतील भराडी देवीच्या २५ फेब्रुवारीला होणाऱ्या जत्रेसाठी मध्य रेल्वे मार्गावरून विशेष १० जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी, पुणे ते सावंतवाडी, पनवेल ते सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी अशा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामुळे अंगणेवाडी जत्रेत जाणाऱ्या नागरिकांना या गाड्यांचा लाभ होणार आहे.
सीएसएमटी ते करमाळी २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५७ सीएसएमटीहून २३ आणि २४ फेब्रुवारीला मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीच्या डब्यांची संरचना १ एसी ३ टायर, ४ स्लीपर श्रेणी, ६ द्वितीय श्रेणी आणि ६ सामान्य श्रेणी अशाप्रकारे असणार आहे.
करमळी ते सीएसएमटी सुपरफास्ट २ विशेष गाडी असणार आहेत. गाडी क्रमांक ०२००६ विशेष गाडी करमळीहून २३ आणि २४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीच्या डब्यांची संरचना एक एसी ३ टायर, ४ स्लीपर श्रेणी, ६ द्वितीय श्रेणी, ६ सामान्य श्रेणी अशाप्रकारे असणार आहे.
पुणे ते सावंतवाडी रोड ते पुणे यादरम्यान अशा २ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१४३१ विशेष गाडी पुण्याहून २५ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता सुटेल, तर दुसरी गाडी ०१४३२ विशेष गाडी सावंतवाडीहून २७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ही गाडी लोणावळा, कर्जत, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीच्या डब्यांची संरचना १ एसी २ टायर, ५ एसी ३ टायर, ८ स्लीपर श्रेणी, ६ सामान्य श्रेणी अशाप्रकारे असणार आहे.
सावंतवाडी रोड ते पनवेल ते सावंतवाडी रोड अशा २ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११६० विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २६ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल. गाडी क्रमांक ०११५९ विशेष गाडी पनवेलहून २६ फेब्रुवारीला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीच्या डब्यांची संरचना १ एसी २ टायर, ५ एसी ३ टायर, ८ स्लीपर श्रेणी आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी अशाप्रकारे असणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा २ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११६१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ फेब्रुवारीला मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल. गाडी क्रमांक ०११६२ विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीच्या डब्यांची संरचना १ एसी २ टायर, २ एसी ३ टायर, ८ स्लीपर क्लास आणि ६ सामान्य श्रेणी अशाप्रकारे असणार आहे.