मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज देणार असल्याचे राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले आहे. राऊत यांच्यावर आज सोमवारी लीलावती रूग्णालयात अँजिओग्राफी आणि त्यानंतर, अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचे निदान झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांची विचारणा केली असून उद्या सकाळी ते लीलावती मध्ये राऊतांना भेटणार आहेत.
हेही वाचा - 'जगाशी स्पर्धा करायची असेल, तर आंध्रातील सरकारी शाळा इंग्रजी माध्यमात हव्या'
आठवड्याभरापूर्वी त्यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काही चाचण्या झाल्या होत्या. तपासण्यांमधून त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाल्याचे दिसून आले. आज दुपारी ताज लँड या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीत त्यांना ठेवले जाणार आहे.