मुंबई - शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यापूर्वी राऊत यांच्यावर मागील वर्षी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एक वर्षांनंतर पुन्हा त्यांचावर ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका
मागील वर्षी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकेकाळी मित्र असलेले आणि सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभी राहिली. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या काळात शरद पवार, सोनिया गांधी यांच्या भेटी-गाठी घेऊन राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आणण्यात संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
गुरुवारी अँजिओप्लास्टी
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होत असताना भाजपकडून येणारे हल्ले परतवून लावण्याचे कामही राऊत यांनी केले होते. आजही ते सरकारची आणि शिवसेनेची भूमिका योग्यरित्या पार पाडत आहेत. एक वर्षांपूर्वी सरकार स्थापन होत असतानाच राऊत यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. आता पुन्हा वर्षभरानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. त्यासाठी ते लिलावती रुग्णालयात दाखल होणार असून गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे.
हेही वाचा - दुःखद : मुंबईत फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने लहानग्याचा मृत्यू
हेही वाचा - राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्योजकांनी ब्रँड अम्बॅसिडर बनावे - मुख्यमंत्री