ETV Bharat / state

'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...

आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर 'अंघोळीची गोळी' या पर्यावरणावर काम करणाऱ्या संघटनेने आता टीका केली आहे. ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

आरे वृक्षतोडप्रकरणी अंघोळीची गोळी संघटनेचे आंदोलन
author img

By

Published : Sep 15, 2019, 5:33 PM IST

मुंबई - आरेतील झाडे वाचाविण्यासाठी सिने कलाकार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरली आहेत. पालिकेने मेट्रोच्या कारशेडसाठी २७०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर केला. आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर 'अंघोळीची गोळी' या पर्यावरणावर काम करणाऱ्या संघटनेने आता टीका केली आहे. ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच संघटनेने पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.

आरे वृक्षतोडप्रकरणी अंघोळीची गोळी संघटनेचे आंदोलन

हेही वाचा - आरेमधील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी; 2700 झाडांची होणार कत्तल

गोरेगाव आरे येथील मेट्रोच्या कारशेडसाठी 2 हजार 700 झाडे तोडण्याचा प्रस्ताव नुकताच महापालिकेत मंजूर झाला. त्याला सत्ताधारी शिवसेनेकडून विरोध केला जात असतानाच पालिका प्रशासनाने झाडे तोडण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. तसेच या झाडे तोडण्याच्या बदल्यात १३ हजार 110 झाडे 30 दिवसात लावण्याचे आदेश पालिकेने मेट्रो रेल्वेला दिले आहेत. यावर मात्र, शिवसेना फक्त माध्यमांना प्रतिक्रिया देत असून प्रत्याक्षात त्यांची भूमिका काही वेगळीच आहे, असा आरोप या संघटनेने केला आहे.

हेही वाचा - प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करा, प्राणीप्रेमींचे निषेध आंदोलन

एकीकडे कोस्टल रोडला समर्थन आणि दुसरीकडे आरे येथे होणाऱ्या वृक्षतोडीला आदित्य ठाकरे विरोध करत आहेत. निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेना याला विरोध करत आहे. तुमची महानगरपालिकेत सत्ता आहे. सरकारमध्ये तुम्ही भागीदार आहात. मग, आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवण्याचा घाट का घातला आहे? शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंघोळीची गोळी या संस्थेचे अविनाश पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला ते स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात, जयंत पाटलांचा नाईकांना टोला

आरे वाचवण्यासाठी राजकीय पक्षांसोबत आता सामाजिक संस्था ही पुढे आल्यात. आंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेने आज आझाद मैदानावर आंदोलन केले. यावेळी पोवाडे गात विरोध केला गेला.

Intro:मुंबई

आरे वृक्षतोडप्रकरणी शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी. दुटप्पी राहू नये. एकीकडे कोस्टल रोडला समर्थन आणि दुसरीकडे आरे येथे होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करत आहेत. विरोध का तर निवडणुका जवळ आल्या आहेत. तुमची महानगरपालिकेत सत्ता आहे. सरकारमध्ये तुम्ही भागीदार आहात. मग, आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवण्याचा घाट का घातला आहे? शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंघोळीची गोळी या संस्थेचे अविनाश पाटील यांनी केली आहे.Body:आरे वाचवण्यासाठी राजकीय पक्षांसोबत आता सामाजिक संस्था ही पुढे आल्यात. आंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेने आज आझाद मैदानावर आंदोलन केले. यावेळी पोवाडे गात विरोध केला गेला.
मेट्रो कारशेडसाठी कारवाई बंद करा. आम्ही आंदोलन बंद करतो. काही जण चुकीची माहिती पसरवत आहे असेही पाटील यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.