ETV Bharat / state

अंगडिया लूट प्रकरण; सहा आरोपींना अटक, पोलिसांनी केले 4 कोटी जप्त - सहा आरोपींना अटक

Angadia Robbery Case : मुंबईतील अंगडियाच्या कार्यालयातून सहा आरोपींनी 4 कोटी रुपयाची लूट केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 30 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून 4 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली.

Angadia Robbery Case
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 11:30 AM IST

मुंबई Angadia Robbery Case : लोकमान्य पोलीस (LT) मार्ग पोलिसांनी अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची 30 तासात उकल करुन 6 आरोपींना अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यात अंगडियाच्या एका माजी कर्मचाऱ्याचाही सहभाग उघडं झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली 4 कोटींहून जास्त रक्कम जप्त केल्याची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे. राजुबा वाघेला (वय 21), अशोकबा वाघेला (वय 26), चरणबा वाघेला (वय 26), महालसिंग दाभी (वय 24) आणि चिरागजी ठाकूर (वय 26) अशी अटक आरोपींची नावं असल्याचंही पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी यावेळी सांगितलं आहे.

अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 30 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून 4 कोटीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी गुजरातमधील पाटण आणि बनासकाटा इथले आहेत. - ज्ञानेश्वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे

अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळबादेवीच्या राम बागेत असलेल्या आदित्य हाईट्स या इमारतीच्या 16 व्या मजल्यावरील केडीएम एंटरप्राइजच्या कार्यालयात चार जण रविवारी सकाळी घुसले होते. तिथं उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे त्यांनी सेलो टेपनं हातपाय बांधले. या चौघांनी कार्यालयात ठेवलेली 4.03 कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन तिथून पळ काढला. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली असून याबाबतची माहिती तत्काळ एलटी मार्ग पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डीसीपी झोन 2 मोहितकुमार गर्ग यांनी चार पथकं तयार करण्याचे आदेश दिले होते. तर या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी प्रदीप भिताडे यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.

अंगडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा सहभाग : या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस पथकानं इमारतीजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यावेळी हर्षद चेतनजी ठाकूर नावाचा आरोपी पूर्वी अंगडियाजवळ काम करत होता, तो त्याच्या एका साथीदारासह इमारतीच्या खाली असल्याचं दिसून आलं. कार्यालयात दरोडा टाकण्यासाठी गेलेले आरोपी खाली आल्यावर सर्वजण एकत्र निघून गेले. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, तांत्रिक तपासात असं दिसून आलं की, गुन्हा केल्यानंतर आरोपी टॅक्सी घेऊन बोरिवली इथल्या नॅशनल पार्कमध्ये गेला. पोलिसांनी टॅक्सी चालकाला शोधून अधिक तपास केला असता, हे सर्व आरोपी खासगी कारमधून गुजरातमधील पाटणकडं निघाल्याची माहिती मिळाली.

पालघरमध्येच आवळल्या आरोपीच्या मुसक्या : पोलिसांनी त्या खासगी कारचा नंबर काढून ती कार शोधून काढली आणि आरोपी गुजरातच्या दिशेनं जात असल्याची माहिती मिळाली. आरोपी पालघरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, एलटी मार्ग पोलिसांचं पथक एका प्रकरणाच्या तपासासंदर्भात गुजरातला गेलं होतं आणि ते मुंबईला परतत होतं. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकानं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पोलीस पथकाला माहिती दिल्यानं पालघरमध्येच आरोपी पकडल्या गेल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी दिली.

हर्षद ठाकूरनं रचला होता कट : अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमधील पाटण आणि बनासकटा येथील असून ते एकमेकांना ओळखत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा जबरी चोरीचा कट हर्षद चेतनजी ठाकूर यानं रचला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, या प्रकरणात सध्या अंगडिया व्यावसायिकाकडं काम करणारा एक कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Angadiya Traders Ransom Case : अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी प्रकरणातील तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
  2. Angadia Extortion Case अंगडिया खंडणी प्रकरणातील तीन अधिकारी पुन्हा मुंबई पोलिसांच्या सेवेत रुजू
  3. Angadia Extortion Case : अंगडिया खंडणी प्रकरणी निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींना अटकपूर्व जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.