ETV Bharat / state

Andheri East Bypoll Result : उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय; नोटाला १२८०६ मते

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहिर झाला ( Andheri By Election result ) आहे. ऋतुजा लटके 53,471 मतांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या ( Rutuja Latke won Andheri bypoll election ) आहेत.

author img

By

Published : Nov 6, 2022, 2:08 PM IST

Updated : Nov 6, 2022, 3:53 PM IST

Rituja Latke
ऋतुजा लटके

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या ( Rituja Latke won Andheri bypoll election ) आहेत. ऋतुजा लटके ६६, ५३० मतांनी विजयी झाल्या आहेत. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल ( Andheri By Election result ) आज जाहिर झाला आहे. ही निवडणूक एकतर्फी असताना सुद्धा जेमतेम ३१.७४ टक्के झाले होते. नोटा या बटनाला ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ सर्वात जास्त मतदारांनी पसंती दिली. नोटांना १२, ८०६ मते मिळाली.

ऋतुजा लटके यांचा विजय : कारण या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या शिवाय असलेल्या चार अपक्ष व दोन छोट्या पक्षांच्या उमेदवारांची अमानत रक्कमही जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले. तर भाजपने मागच्या २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना तिकीट देत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु अखेरच्या क्षणी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण म्हणून निवडणुकीतून त्यांचा अर्ज मागे घेतला व ही निवडणूक एकतर्फी झाली. असे असताना या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय हा निश्चितच मानला जात होता व त्यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण ताकत पणाला लावली होती. आणि तसे झालेही. या निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात मागील १५ वर्षाच्या तुलनेत सर्वात निच्चांक म्हणजे जेमतेम ३१.७४ टक्के मतदान झाल्याने ही शिवसेनेसाठी चिंतेची बाब होती.

शिवसेना बेसावध राहिली : भाजपच्या मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आपला विजय सोप्पा झाला आहे या भ्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक ( Shiv Sena remained inactive ) राहिली. पण मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणे सुद्धा गरजेचे होते. या गोष्टीकडे त्यांचे दुर्लक्ष राहीले. आदित्य ठाकरे यांचा एखाद दुसरा अपवाद वगळता माजी मंत्री, आमदार नेते अनिल परब सोडले तर इतर कुणी नेते फारसे या मतदार संघात फिरकले नाहीत. ही निवडणूक चुरशीची करण्यासाठी या निवडणुकीत भरघोस मतांनी आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी जी तळमळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुरुवातीला दिसत होती ती नंतर राहिली असे पाहायला मिळाले नाही. त्यात शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने एकनाथ शिंदे याची बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या मतदारांनी सुद्धा या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

नोटा राहील्या दुसऱ्या क्रमांकावर : या निवडणुकीत फक्त ३१.७४ टक्के मतदान झाल्याने उद्धव ठाकरे शिवसेना गटासाठी हा चिंतेचा विषय आहे. त्यात ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ असणारी सहानुभुतीची लाट. त्यात भाजपने आपला तागडीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. समोर असणारे ६ उमेदवारही नवखे होते. याच कारणासाठी मतदानाची टक्केवारी ( Rutuja Latke victory ) घसरली.

अंतिम मतमोजणी आकडेवारी -महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत उमेदवारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल) आणि 'ईव्हीएम' याद्वारे मिळालेली एकत्रित अंतिम मते खालील प्रमाणे :

१) ऋतुजा लटके: ६६५३०

२) बाला नाडार : १५१५

३) मनोज नायक : ९००

४) नीना खेडेकर : १५३१

५) फरहाना सय्यद : १०९३

६) मिलिंद कांबळे : ६२४

७) राजेश त्रिपाठी : १५७१

आणि

नोटा : १२८०६

एकूण मते : ८६५७०

Last Updated : Nov 6, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.