ETV Bharat / state

Anand Paranjpe Vs Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलले, अकरा गुन्हे दाखल.. आनंद परांजपे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा - Mumbai High Court News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध काही अपशब्द काढले होते. माजी खासदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर अकरा गुन्हे दाखल झाले होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पोलिसांनी आनंद परांजपे यांच्यावरील एकाच गुन्ह्यात कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तसेच न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत आनंद परांजपे यांच्यावर आरोप पत्र दाखल करू नये असे देखील पोलिसांना सुनावणीत सांगितले.

Mumbai News
आनंद परांजपे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
author img

By

Published : Feb 8, 2023, 6:42 AM IST

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात ट्विटरवर आनंद परांजपे यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यापार्श्वभूमीवर माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावे अन्य 10 प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील एकूण 11 गुण्यांपैकी एका गुन्हा संदर्भात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण खंडपीठापुढे अन्य 10 प्रकरणाबाबत पुढील दोन आठवडामध्ये अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती पोलिसांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील तपास सुरू ठेवण्यास सांगितले. परंतु उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत पोलीस आनंद परांजपे यांच्यावर आरोप पत्र दाखल करू शकत नाही असे देखील पोलिसांना बजावले.

काय होते नेमके प्रकरण : मुख्यमंत्री, बाळासाहेबांची शिवसेनाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मानहानीकारक शब्द उच्चारल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगरातील बाळासाहेबांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून येथील मध्यवर्ती व उल्हासनगर अशा दोन पोलीस ठाण्यात आनंद परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख जयकुमार केनी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणि विभागप्रमुख प्रमोद पांडे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे करण्यात आले आहेत. ह्या गुन्ह्यातील तपास पोलीस करत होते. त्यामुळे आनंद परांजपे यांच्यावर अटकेची भीती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द : तसेच हिललाईन पोलीस ठाण्यात बाळासाहेबांच्या युवासेनेचे विभाग अधिकारी विनसेंट पटाळी यांनी तक्रार दिली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयपीसी कलम 153, 501, 504 नुसार परांजपेंविरोधात कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी तर डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे आनंद परांजपे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे याप्रकरणात हे गुन्हे एकत्र करून रद्द करण्याची मागणी करत आनंद परांजपे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आनंद परांजपे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती.

हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही; आदित्य ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.