ETV Bharat / state

Face to Face : मुंबईत आंतरराष्ट्रीय मत्स्यालय, तर महाराष्ट्रात मोठे संग्रहालय उभारणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार - तर महाराष्ट्रात मोठे संग्रहालय उभारणार

मुंबईत मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. याकरिता मासे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना, तसेच स्थानिक मच्छिमारांना मच्छी ( Sudhir Mungantiwar Face to Face ) साठवण्याकरिता ( International Standard Aquarium is Being Set Up in Mumbai ) तसेच व्यवसाय वृद्धीसाठी ( Fisheries Minister Sudhir Mungantiwar has Told E TV India ) सरकार मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय बांधणार ( Plan to Set up a Museum in The State ) आहे. तर राज्यात एक जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय बांधण्याचा सरकारचा मानस असल्याचे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ( Fisheries Minister Sudhir Mungantiwar has Told E TV India ) सांगितले.

An International Aquarium will be Set up in Mumbai and a Museum in Maharashtra
मुंबईत आंतरराष्ट्रीय मत्स्यालय तर महाराष्ट्रात मोठे वस्तूसंग्रहालय उभारणार
author img

By

Published : Nov 25, 2022, 8:38 PM IST

मुंबई : मुंबईत असलेले तारापूरवाला मत्स्यालय सध्या बंद ( Sudhir Mungantiwar Face to Face ) असले, तरी भविष्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात ( International Standard Aquarium is Being Set Up in Mumbai ) येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ई-टीव्ही भारतशी ( Fisheries Minister Sudhir Mungantiwar has Told E TV India ) बोलताना दिली आहे. तर महाराष्ट्राचा हॅपिनेट ( Recitation of Vand Mataram to Generate Vitality and Energy ) इंडेक्स वाढवण्यासाठी सांस्कृतिक ( Plan to Set up a Museum in The State ) विभागाच्या वतीने खूप काम केले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार फेस टू फेस

राज्यात प्रत्येकाच्या मनात चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होण्यासाठी वंद मातरमचे उच्चारण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात प्रत्येकाच्या मनात चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा तेव्हाच निर्माण होते जेव्हा देशभक्तीने प्रेरित असलेल्या शब्दांचे उच्चारण होते. त्यामुळे प्रत्येकाने इंग्रजांनी दिलेला हॅलो शब्द बोलण्याऐवजी वंदे मातरम या शब्दाचे उच्चारण करावे ही आपली संकल्पना आहे. या संकल्पनेला लगेच एका दिवसात किंवा एका वर्षात सर्वांकडून प्रतिसाद मिळेल असे बिलकुल नाही. मात्र, हे लोकांच्या नक्कीच अंगवळणी पडेल आणि या शब्दामुळे एक प्रकारची ऊर्जा चैतन्य निर्माण होईल अशी आपल्याला खात्री असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

"वंदे मातरम" उच्चारण्याची कोणालाही सक्ती नाही : काही जणांचा "वंदे मातरम्"ला विरोध होता. मात्र, तो त्यांनी गैरसमजातून केलेला विरोध होता. "वंदे मातरम" उच्चारण्याची आपण कुणालाही सक्ती केलेली नाही तसेच ज्याला जो शब्द आवडतो उदाहरणार्थ "जय महाराष्ट्र" तर त्याचे उच्चारण करायला काहीही हरकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतील ते "वंदे मातरम" म्हणतील का असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी "जय महाराष्ट्र" म्हणाले तर काय हरकत आहे. त्यामुळे याचा विपर्यास न करता मातृभूमीला नमन करणारा हा शब्द सर्वांनी उच्चारला पाहिजे. आपल्याला लोकांचे मतपरिवर्तन करायचे आहे आणि ते होणार, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्राचा हॅपिनेस इंडेक्स वाढवणार : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात 193 देश सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघात महाराष्ट्राचा क्रमांक आर्थिकदृष्ट्या 36 व्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, या क्रमांकापेक्षा आपल्याला महाराष्ट्राचा हॅपिनेस इंडेक्स महत्त्वाचा आहे. हॅपिनेट इंडेक्स वाढवण्यासाठी शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा आणि वारसा असलेली आपली संस्कृती पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. सांस्कृतिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि लोकांच्या मनात आनंदाच्या लहरी उत्पन्न करण्यासाठी आपण विविध संकल्पना या विभागामार्फत राबवणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय : मुंबईतील तारापोरवाला मत्सालय सध्या गिरगाव चौपाटी येथे आहे. मात्र मेट्रोच्या कामामुळे आणि कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे मत्स्यालय बंद आहे. मुंबईत वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय करण्याचा मत्स्यव्यवसाय विभागाचा मानस आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि विविध माहिती असलेले जैवविविधता दाखवणारे केवळ रंगबिरंगी मासे न दाखवता माशांच्या प्रजाती आणि त्यासंदर्भात अधिक माहिती देणारे विस्तृत आणि व्यापक असे मत्स्यालय निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे.

आरे दूध डेअरीची जागेवर भव्य मत्स्यालय उभारण्याचा सरकारचा मानस : मत्स्यालय उभारण्याकरिता मुंबईतील वरळी येथील आरे दूध डेअरीची जागा सरकारने मागितली आहे. ही जागा उपलब्ध होताच या ठिकाणी भव्य मत्स्यालय उभे करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार केला जात आहे. एखादी सल्लागार कंपनी नेमून याबाबतीत आम्ही लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय कसे होईल दुबई आणि सिंगापूरपेक्षा ते कसे भव्य असेल याचा प्रयत्न करीत असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात संग्रहालयदेखील उभारणार : आमच्याकडे राज्यात संग्रहालय उभारावे यासाठी एक आराखडा आहे सध्या पुण्याजवळ आम्ही सहा एकर जागा पाहिली आहे. मात्र, या प्रकल्पासाठी सुमारे 30 एकर जागेची आवश्यकता आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशात एकच वस्तुसंग्रहालय बिहार येथे आहे महाराष्ट्र बिहार पेक्षा पुढे असायला पाहिजे त्यानिमित्ताने त्यापेक्षा अधिक चांगले संग्रहालय तयार करण्याचा आमचा विचार आहे म्हणूनच आमच्याकडे असलेल्या 88 हजार दुर्मिळ वस्तू जगाला दाखवण्यासाठी आम्ही भव्य असे वस्तू संग्रहालय उभारणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

मत्स्य व्यवसायवाढीसाठी प्रयत्न : राज्यात सध्या मत्स्य व्यवसाय जोरात सुरू आहे. मात्र, असे असले तरी मत्स्यनिर्मितीमध्ये महाराष्ट्र कमी आहे. याची आम्हाला जाणीव आहे. महाराष्ट्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. परंतु, मासे जतन करणे अथवा निर्माण करणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. इंग्लंड फिशिंगबाबत कायदा कालबाह्य झाला आहे. त्यामुळे आता यासंदर्भात नव्याने विचार करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र, केंद्र सरकारसोबत चर्चा करून भुवनेश्वर येथे असलेल्या फिशिंग अनुसंधान केंद्राचे उपकेंद्र विदर्भात मिळावे आणि त्याद्वारे अधिक मासेमारी व्यवसायाला चालना मिळावी यासाठी विभागाचा प्रयत्न आहे सध्या 5884 कोटी रुपयांची मत्स्य विक्री या वर्षी झाली आहे. मात्र, ही अधिकाधिक वाढ कशी होईल आणि लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे सरकार लक्ष देत असून नवनवीन योजना आणण्याचा आमचा विचार आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.