ETV Bharat / state

Monsoon session 2023 : मुंबई महापाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी - मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा - मुंबईतील आरोग्य सेवेचा बोजवारा

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल, तसेच गरज पडली तर मुंबई महापालिका रुग्ण सेवेची श्वेतपत्रिका काढावी लागेल अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते उत्तर देत होते. (Monsoon session 2023)

Minister Uday Samant
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Aug 4, 2023, 2:53 PM IST

मुंबई : मुंबईतील आरोग्य सेवेबाबत सकाळी विधनसभेच्या विशेष कामकाजात आमदार अमिन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभागी होताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा सभागृहात मांडला. मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातून सुध्दा मुंबईत रुग्ण मोठया प्रमाणात येतात.

या सगळयाचा ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने या सगळयाचा एक समग्र आढावा घ्यावा किती रुग्ण मुंबईत येतात, त्यांना असलेली रुग्णालये पुरेशी आहेत का, त्यावर किती खर्च होतो याची श्वेतपत्रीका काढावी, अशी मागणी शेलार यांनी केली. धर्मदाय आयुक्तांच्या अंतर्गत येणारी रुग्णालये आहेत त्यांना सरकारकडून देण्यात येणा-या सुविधा तसेच त्यांच्या कडून मिळणारी सेवा याबाबतचा आढावा घेऊन पडताळणी करावी. ते अटीशर्ती पाळतात का, अशी विचारणाही त्यांनी केली.

मुंबई महापालिका वर्षाला सुमारे ४ हजार कोटी म्हणजे पाच वर्षात २० हजार कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च करते. साधारणत: ढोबळ अंदाज मांडला तर ४५ हजार मुंबईकरांसाठी हे खर्च होतात. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. मुंबईकर ज्या पध्दतीने कर देतात त्या पटीने त्यांना सुविधा मिळत नाहीत यामध्ये कुठेही ताळमेळ दिसून येत नाही, महापालिका एकिकडे पाच वर्षाला २० हजार कोटी रुपये खर्च करते आण‍ि रुग्णांना औषधे मिळत नाहीत.

पालिका रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना बाहेर औषधे आणण्यासाठी पाठविण्या येते, एक्सरे, सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवले जाते. त्यामुळे यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्याची चौकशी व्हावी, खाजगी रुग्णालयात जी औषधे आण‍ि इंजेक्सन दिली जातात त्याचे दर अवाजवी आकारले जातात, त्यामुळे रुग्णांना नाहक फटका बसतो त्यामुळे सरकारने यासाठी एक दरपत्रक जाहीर करावे, अशी मागणी शेलार यांनी केली.

तर मुंबईत येणा-या कॅन्सर रुग्णालयांच्या नातेवाईंकाची राहण्याची मोठी गैरसोय होते त्यासाठी काही खास इमारती बांधण्यात याव्यात असेही शेलार म्हणाले. दरम्यान, चर्चेमध्ये आमदार मनिषा चौधरी यांनीही उपनगरातील रुग्ण्सेवेचा उडलेला बोजवारा मांडला. दरम्यान या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री उदय समांत यांनी मुंबईतील आरोग्य सेवेची श्वेतपत्रीका काढण्याची गरज मान्य केली तसेच मुंबई महापालिका रुग्णालयातील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.