ETV Bharat / state

बेनकाब नवाब भी होता है और वह जरूर होगा - अमृता फडणवीस - अमृता फडणवीसांचे नवाब मलिकांना उत्तर

मलिकांच्या आरोपानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. 'रिव्हर मार्च'ची ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. या संस्थेने त्यावेळी माझ्याशी संपर्क केला होता. त्याला मी सहकार्यसुद्धा केले होते. स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली होती. याशिवाय अर्थमंत्री सुधारी मुनगंटीवार आणि अनेक अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. कारण नदी पुनरुज्जीवनाचं महत्वपूर्ण काम ही संस्था करत होती.

amruta fadnavis nawab malik
अमृता फडणवीस नवाब मलिक
author img

By

Published : Nov 1, 2021, 8:59 PM IST

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित व्यक्तीशी माझा काही संबंध नाही. फक्त आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. मी राजकारणी नाही तर समाजसेवक आहे. माझ्या अंगावर कोणीही आले तर मी सोडणार नाही. बेनकाब नवाब भी होता है और वह जरूर होगा, अशी टीका अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केली आहे.

आम्हाला बदनाम करण्याचा डाव -

मलिकांच्या आरोपानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. 'रिव्हर मार्च'ची ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. या संस्थेने त्यावेळी माझ्याशी संपर्क केला होता. त्याला मी सहकार्यसुद्धा केले होते. स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली होती. याशिवाय अर्थमंत्री सुधारी मुनगंटीवार आणि अनेक अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. कारण नदी पुनरुज्जीवनाचं महत्वपूर्ण काम ही संस्था करत होती. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट मोहीम सुद्धा सुरु केली होती. त्यांच्या प्रचारासाठी मी एक गीतही रेकॉर्ड केलं होते. त्या गाण्याचे रेकॅार्डिंग मुंबईसाठी मोफत स्वरूपात तयार करण्यात आले होते.

या गाण्यात मुंबईचे डब्बेवाले, कोळी बांधव यांचा समावेश होता. गाण्यासाठी कोणतही शुल्क घेण्यात आले नाही. मला अतिशय वाईट वाटल की रिव्हर मार्च या संस्थेचे नाव ड्रग्स संदर्भात जोडले गेले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माझ्यावर लावलेले आरोप तथ्यहीन आहे. संबंधित व्यक्तीशी माझा काही संबंध नाही. फक्त आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असल्याचेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

हेही वाचा - VIDEO : नवाब मलिक-देवेंद्र फडणवीसांमध्ये कलगीतुरा; पाहा, मलिकांच्या गंभीर आरोपांवर काय म्हणाले फडणवीस?

बेनकाब नवाब भी होता है...

नवाब मलिक यांनी त्यांच्या जावायाला विचाराले की, ड्रग्सबाबत माझ्या अंगावर जे येतील त्यांना मी सोडणार नाही. ज्या महिला सरळ रस्त्यांनी जात आहेत. त्यांना का टार्गेट केल जात आहे. 'तुम्ही मर्द आहात तुम्ही थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करा, माझ्यामार्फत का आरोप करतात. मी राजकारणी नाही मी समाज सेवक आहे. माझ्या अंगावर कोणीही आले तर मी सोडणार नाही. मलिकांना आणि त्यांच्या सुपर बॉसला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. कारण बेनकाब नवाब भी होता है और वह जरूर होगा, अशी टीका अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केली.

काय आहे रिव्हर अँथम?

'मुंबई रिव्हर अँथम' हे गाणे मुंबईतल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनावर आधारेलेले आहे. या गाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी देखील सहभाग घेतला होता. तेव्हाही या गाण्यावरून चर्चेला उधाण आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.