ETV Bharat / state

ट्विट करत अमृता फडणवीस यांनी साधना मंत्री नवाब मलिकांवर निशाणा - drug racket connection

अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ड्रग्स पेडलर जयदीप राणा याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्यासाठी वित्त पुरवठा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट कर चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ?, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, अशा शब्दात नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस
author img

By

Published : Nov 1, 2021, 4:48 PM IST

मुंबई - अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ड्रग्स पेडलर जयदीप राणा याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्यासाठी वित्त पुरवठा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट कर चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ?, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, अशा शब्दात नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांच्यावर आरोप

  • चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf

    — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांचा ट्विटरद्वारे एक फोटो शेअर करत त्यांच्यावर ड्रग्स संबंधित आरोप लगावला आहे. त्या फोटोमध्ये देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांच्या सोबत जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जयदीप राणा असून ड्रग्स प्रकरणांमध्ये ही व्यक्ती जेलमध्ये आहे, असे सांगत थेट अमृता फडणवीस व देवेंद्र फडवणीस यांचा ड्रग्स प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

अमृता फडणवीस यांचेही बॉलिवूडशी संबंध

  • चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ?
    कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते !

    — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात राजकीय नेत्यांवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना आता यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाला आता एक नवीन वळण येताना दिसत आहे. क्रुझ ड्रग्स पार्टी हे प्रकरण एकंदरीत बॉलिवूडशी संबंधित असल्याने व अमृता फडवणीस यादेखील एक गायिका असल्याने त्यांचेही बॉलीवूडशी जवळचे संबंध आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे ही वाचा - महाराष्ट्रात फडणवीसांच्या इशाऱ्यावरच ड्रग्जचा धंदा; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.