ETV Bharat / state

Amitabh Bachchan Tweet On Elon Musk : बीग बींच्या मजेदार ट्विटनंतर एलन मस्कनी घेतली माघार, बीग बी म्हणाले तू चीज बडी है 'मस्क मस्क' - Amitabh Bachchan Tweet

ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक गेल्यानंतर बीग बी अमिताभ बच्चन यांनी मजेदार ट्विट केले होते. त्यानंतर ट्विटरने बीग बींची ब्लू टिक परत केली. त्यानंतर बीग बींनी एलन मस्कचे आभार मानत तू चीज बडी है 'मस्क मस्क' असे आणखी एक मजेदार ट्विट केले आहे.

Amitabh Bachchan Tweet On Elon Musk
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 22, 2023, 12:41 PM IST

हैदराबाद : बीग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरच्या खात्यावरुन ब्लू टिक गायब झाल्यानंतर त्यांनी एक मजेदार ट्विट केले होते. त्यांच्या या मजेदार ट्विटची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरू आहे. ही चर्चा एलन मस्क यांच्यापर्यंत पोहोचली की काय, चक्क एलन मस्क यांनी बीग बींना त्यांची ब्लू टिक परत केली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी ट्विटरचे खूप खूप आभार मानत, तू चीज बडी है मस्क मस्क असे आणखी एक मजेदार ट्विट केले आहे. मात्र आता बीग बींच्या या मजेदार ट्विट आणि ब्लू टिकची चांगलीच चर्चा रंगत आहे.

  • T 4624 -
    ए Musk भैया ! बहुत बहुत धन्यवाद देत हैं हम आपका !
    उ , नील कमल ✔️ लग गवा हमार नाम के आगे !
    अब का बताई भैया ! 😁
    गाना गये का मन करत है हमार !
    सनबो का ?
    इ लेओ सुना :
    "तू चीज़ बड़ी है musk musk ... तू चीज़ बड़ी है, musk " 🎶

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय होते प्रकरण : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी 20 एप्रिलपासून वापरकर्त्यांच्या खात्यावरुन ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींच्या खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात आल्या आहेत. त्यातच बीग बी अमिताभ बच्चन यांच्या खात्यावरुनही ब्लू टिक हटवण्यात आली होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी ट्विटरला टॅग करुन मजेदार ट्विट केले होते.

काय केले होते अमिताभ बच्चन यांनी ट्विट : आपल्या ट्विटरच्या खात्यावरुन ब्लू टिक गायब झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत होते. बीग बींनी ट्विटरला टॅग करुन ओ ट्विटरवाल्या भाऊ आता तर पैसे पण भरले. आता तरी माझ्या खात्यावर असलेली ब्लू टिक परत कर, ब्लू टिकसाठी हातही जोडले, आता पाय पण जोडू का ? असे मजेदार ट्विट केले होते. या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यामुळे बीग बींच्या या ट्विटची चांगलीच चर्चा आता रंगली असून ट्विटरनेही बीग बींचे गाऱ्हाणे ऐकूण त्यांची ब्लू टिक परत केली आहे.

काय आहे ट्विटरचे नवे धोरण : ट्विटरने एक एप्रिलपासून आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावरुन ब्लू टिक काढून टाकण्याचे नवीन धोरण जाहीर केले होते. ज्या वापरकर्त्यांना ट्विटर खात्यावर ब्लू टिक पाहिजे, त्यांनी पैसे मोजून ब्लू टिक घेण्याचे धोरण ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी जाहीर केले आहे. अगोदर एक एप्रिलला ब्लू टिक काढून टाकण्यात येणार होत्या, मात्र त्यानंतर 20 एप्रिलपासून ब्लू टिक काढून टाकण्याचे एलन मस्क यांनी जाहीर केले होते.

हेही वाचा - Amitabh Bachchan on Blue Tick : ब्लू टिक गेल्यानंतर बीग बींचा ट्विटरला टोला, 'हात जोडलाय आता काय पाय पण जोडू का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.