ETV Bharat / state

गंभीर आजारी रुग्णांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या, अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना मागणी - amit thackeray on train news

रुग्णालयात जाण्याासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूकीचा वापर करतात. ग्रामीण भागातील रुग्णांनाही उपचारासाठी शहरात जावे लागते. मात्र,असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्यासोबत नातेवाईकांना उपचारासाठी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले.

Amit Thackeray demands CM to allow ill patient to travel by train
गंभीर आजारी रुग्णांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या - अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना मागणी
author img

By

Published : Sep 5, 2020, 9:04 AM IST

मुंबई - गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत नातेवाईकांना उपचारासाठी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले.

गेल्या सहा महिन्यांच्या कोरोना लॉकडाउनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयात जाण्याासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूकीचा वापर करतात. ग्रामीण भागातील रुग्णांनाही उपचारासाठी शहरात जावे लागते. मात्र, असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. डायलिसिसचा 300 ते 500 रुपये खर्च रुग्णांना परवडत नाही, त्यातच रुग्णालयात जाण्यासाठी 1 हजार ते 1500 रुपये खासगी वाहनाला द्यावे लागतात.

Amit Thackeray demands CM to allow ill patient to travel by train
गंभीर आजारी रुग्णांच्या रेल्वे प्रवासासंदर्भात अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र

हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिसऱ्या दिवशीही वाढ, २४ तासात नव्या १९२९ रुग्णांची नोंद

कोरोनामुळे गंभीर आजारी रुग्णांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी नाही. तसेच, सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. तसेच, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान नातेवाईकांनासोबत नेण्याची गरज असते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मुभा देणे गरजेचे आहे. त्यामुळे, गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी मनसेच्या वतीने राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाकडे करत आहोत. मानवतेच्या दृष्टीने याचा विचार करावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.