ETV Bharat / state

Amit Shah on Mumbai Visit : भाजपचाच महापौर मुंबईत बसवा- अमित शाह यांच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील मतदारांना आकर्षित करणे, इतर पक्षातील नेते पक्षात घेणे व मुंबई महापालिका निवडणूक अशा विविध विषयांवर बैठकीत त्यांनी चर्चा केली आहे.

अमित शाह यांचा मुंबई दौरा
Amit Shah on Mumbai Visit
author img

By

Published : Apr 16, 2023, 10:34 AM IST

Updated : Apr 16, 2023, 12:02 PM IST

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असून शनिवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबतही बैठक घेऊन मुंबईतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुद्धा घेतला. यानंतर बोलताना अमित शाह यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या कामासाठी तयारीला लागा, अशा सूचनाही दिल्या असल्याचे मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

मुंबई महापालिका निवडणूक फार प्रतिष्ठेची - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शनिवारी सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले. मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर सह्याद्री या अतिथीगृहात अमित शहा यांनी रात्री भाजप नेत्यांच्या बैठकी घेतल्या. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अमित शहा यांनी भाजपची कोअर कमिटीची बैठक घेतली.

शाह यांनी बुथनिहाय माहिती घेतली-बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील आमदार, खासदार पुनम महाजन, खासदार गोपाल शेट्टी, खासदार मनोज कोटक, मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत अमित शहा यांनी मुंबई निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आढावा घेतला. मुंबई महानगर पालिका ही निवडणूक फार प्रतिष्ठेची आहे. प्रत्येक बुथबाबत तयारीविषयी अमित शाहांना या बैठकीत माहिती देण्यात आली.

मतदारांना आकर्षित करण्याकरिता चर्चामहाविकास आघाडीची सध्या मुंबईत ताकद काय आहे? त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कुठल्या नेत्यांना पक्षामध्ये आणता येईल, याबाबतसुद्धा या बैठकीत चर्चा झाली. तसेच मुंबई विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत केंद्राकडे विषय प्रलंबित आहे. तो कसा मार्गी लावता येईल यावर ही चर्चा झाली. कारण मुंबईत निवडणुका असल्याकारणाने मुंबईत झोपडपट्टीवासीयांचा मतदारांचा एक मोठा वर्ग आहे. जर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मिटला तर त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात होईल असेही म्हटले जात आहे.

सात कलमी कार्यक्रम योजना प्रत्येक वॉर्डमध्ये- अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इतिवृत्त अमित शाह यांना देण्यात आलेले आहे. मुंबईत भाजप, एकनाथ शिंदे गट, आरपीआय व मित्र पक्षांच्या एकजुटीने भाजपचाच महापौर बसवण्यासाठी सात कलमी कार्यक्रम योजना प्रत्येक वॉर्डमध्ये घेण्यात आलेली आहे. प्रत्येक वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने योजना व नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबईकरांची सेवा करण्याची संधी नक्की आपणाला भेटेल असेही शाह म्हणाल्याची माहिती शेलार यांनी दिली.

दरम्यान, अमित शाह हे आज खारघरमधील भव्य कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपसह शिंदे सरकारनेदेखील नियोजन केलेले आहे.

हेही वाचा- Maharashtra Bhushan Award 2022: केंद्रीय मंत्री अमित शाह आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार प्रदान करणार

Last Updated : Apr 16, 2023, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.