मुंबई - अथर्व फाऊंडेशनतर्फे येथील गोराई व मनोरी गावातील नागरिकांसाठी आज खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनेक वर्षांपासून येथील नागरिकांची रुग्णवाहिकेसाठी मागणी होती. ती आज पूर्ण होत आहे. यामुळे येथील नागरिकांची अडचण दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, माजी नगरसेवक शिवा शेट्टी, अथर्व फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा वर्षा राणे आदी उपस्थित होते.
नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न -
गोराई आणि मनोरी परिसरात अनेक वर्षांपासून वीज आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्नांसोबत इतर प्रश्न होते. ते सोडविण्याचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. तसेच मनोरीतील ग्रामीण दवाखान्याला नवीन रुप देण्यात येणार आहे. यासोबतच हिंदू स्मशानभूमीचे काम करण्यात येणार आहे, अशी माहितीही आमदार सुनील राणे यांनी दिली.
हेही वाचा - कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी
आदिवासींना घरे -
आगामी काळात केंद्र सरकारच्या वतीने येथील गोराईच्या जामदार पाडा या वनक्षेत्रात आदीवासी बांधवाना घरे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.