ETV Bharat / state

आंबेजोगाईचे 38 निवासी डॉक्टर मुंबईकरांच्या मदतीला दाखल, सेव्हन हिलमध्ये देणार सेवा - Ambejogai doctors in Mumbai

रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने आता डॉक्टर-नर्सेस कमी पडू लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने केरळकडे 50 डॉक्टर आणि 100 नर्सची मागणी केली. त्यानुसार ही टीम आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहे. पण त्यांच्या आधीच आपल्याच राज्यातील डॉक्टर स्वतःहून मुंबईकरांच्या मदतीला धावून आले आहेत.

ambejogai
आंबेजोगाईचे 38 निवासी डॉक्टर मुंबईकरांच्या मदतीला दाखल
author img

By

Published : May 31, 2020, 4:34 PM IST

मुंबई - राज्याच्या राजधानीत कॊरोनाचा कहर वाढत असताना मनुष्यबळ अपुरे पडत आहे. अशावेळी मुंबईकरांच्या मदतीला अंबेजोगाईचे 38 निवासी डॉक्टर धावून आले आहेत. डॉक्टरांची ही टीम मध्यरात्री 3 वाजता अंबेजोगाईवरून निघाली होती. ती संध्याकाळी 5 वाजता मुंबईत दाखल झाली आहे. आता ही टीम पुढचे 15 दिवस सेव्हन हिलमध्ये रुग्णसेवा देणार आहे.

मार्चपासून मुंबईत मार्डचे निवास डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, सिपीएस डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टर जीवाची बाजी लावत काम करत आहेत. काही डॉक्टर कॊरोनाग्रस्तही होत आहेत. कॊरोनामुक्त झाल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू होत आहेत. पण त्याचवेळी रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने आता डॉक्टर-नर्सेस कमी पडू लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने केरळकडे 50 डॉक्टर आणि 100 नर्सची मागणी केली. त्यानुसार ही टीम आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहे. पण त्यांच्या आधीच आपल्याच राज्यातील डॉक्टर स्वतःहून मुंबईकरांच्या मदतीला धावून आले आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज, अंबेजोगाई येथील हे विद्यार्थी आहेत. 38 डॉक्टरांच्या या टीममध्ये 16 विद्यार्थीनीही आहेत. या टीमच्या राहण्याची व्यवस्था ललित हॉटेलमध्ये करण्यात आली असून ते सेव्हन हिलमध्ये 15 दिवस काम करतील.

मुंबईतील आमचे मार्डचे डॉक्टर आणि इतर डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत ते काम करत असून त्यांच्यावर खूप मोठा ताण पडला आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आलो आहोतच, पण डॉक्टर म्हणून अशा परिस्थितीत काम करणे, रुग्णसेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही हे कर्तव्य पार पाडत आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. विजय पवार, अध्यक्ष, अंबेजोगाई, मार्ड यांनी दिली आहे.

आता या डॉक्टरांची मोठी मदत होणार आहे. दरम्यान याआधी वर्ध्याच्या अंदाजे 15 डॉक्टरांची टीम ही मुंबईत काम करून परत गेली आहे. तर अजून गरज पडल्यास महाराष्ट्रातील ग्रीन झोनमधून डॉक्टरांना बोलावण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.