ETV Bharat / state

Ambadas Danve on G 20: 'जी 20' चा आपल्या देशात डांगोरा का पिटला जातोय- अंबादास दानवेंचा सवाल

संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या जी 20 शिखर परिषदेला औपचारिकपणे आजपासून दिल्ली येथे प्रारंभ होतोय. जगभरातील वीस देशातील दिग्गज नेते या परिषदेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. सुरक्षेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर पोलीस सज्ज झालेत. अनेक ठिकाणी सुरक्षा उपायोजनेसाठी पडद्यांचा वापर करण्यात आलाय. यावरून राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

Ambadas Danve on G 20
अंबादास दानवे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 8:09 PM IST

अंबादास दानवे यांचा माध्यमांशी संवाद

मुंबई : जगातील 20 देशांची मिळून 'जी 20' ही एक संघटना आहे. दरवर्षी त्यातील एका देशाला जी 20 परिषदेचं आयोजनपद मिळत असतं. त्या देशांमध्ये या परिषदेचं आयोजन होत असतं. 'जी 20' चा आपल्या देशात डांगोरा का पिटला जातोय, असा प्रश्न विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. आमच्या ग्रामीण भागात एक सप्ताह, कीर्तन असतं. त्याचा नारळ द्यावा लागतो. यावर्षी या गावी, पुढच्या वर्षी त्या गावी तसंच या 'जी 20' परिषदेचं असतं.

जनतेच्या पैशाची पैशाची उधळपट्टी : यावर्षी 'जी 20' भारतात आयोजित होत आहे. या परिषदेचा समाज माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर डांगोरा पिटला जातोय. काही कामानिमित्त मी दिल्लीला गेलो होतो. काही ठिकाणी पडदे लावले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी लोकांची गैरसोय होतेय. त्यामुळं सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर केलाय. तसंच 'जी 20'च्या माध्यमातून जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केली जातेय, असा दावाही त्यांनी केलाय. सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मणिपूरमध्ये शाखा खोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अंबादास दानवे यांनी निशाणा साधलाय. राजस्थानमधील गहलोत मंत्रिमंडळात असलेल्या माजी मंत्र्यांनी आज शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, त्यांनी आता मणिपूरमध्ये देखील आपली शाखा काढायला काही हरकत नाही. 32 देशात तुमच्या गद्दारीची चर्चा झालीय. राजस्थानमध्ये तुमची शाखा होत असेल, तर मणिपूरमध्ये देखील हिंसाचार सुरूय. त्या ठिकाणी सुद्धा तुमची शाखा होणं आवश्यक आहे. आपण आपल्या पक्षाची शाखा मणिपूरमध्ये करावी असं, आवाहनही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलंय.

सरकारचं जनतेकडे लक्ष नाही : राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता फार आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी अडीच हजार रुपयांपासून पाच हजार रुपये मोजावे लागतात. सरकारचं याकडं कोणतंही लक्ष नाही. सरकार फक्त शो बाजीत रमलं आहे. कितीही पाऊस झाला तरी, शेतकऱ्यांचं पीक हातातून आता जाणार आहे, स्पष्ट दिसतंय. पीकविमा सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण मिळत नाही. फक्त दही हंडी फोडून चालत नाही, सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यास कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी (Ambadas Danve on G20 conference) केलाय.

मराठा आरक्षण : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात हे सरकार संवेदनशील नाही. ते फक्त मागील सरकारवर आरोप करत आहे. तुम्ही आता 13-14 महिन्यापासून राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहात. तुम्ही तुमची बाजू मांडा. केंद्र सरकारनं आता विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणला पाहिजे. हे सरकार मराठ्यांना न्याय देऊ शकत नसल्याचा दावाही दावाही दानवे यांनी केलाय.

एक फुल दोन हाफ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री येथे मुख्यमंत्र्यासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं कोणीचं उपस्थित नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर बोलताना दानवे म्हणाले की, खरंतर अशा बैठकांमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना देखील बोलवायला हवं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधी पक्ष नेत्यांना देखील आमंत्रित करत होते. या सरकारमध्ये एक फुल दोन हाफ मिळूनच निर्णय घेतात, बाकी आमदारांची काय परिस्थिती आहे. शिष्ट मंडळाव्यतिरिक्त उर्वरित लोक या बैठकीत कसे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दौरे करून, दिखावा निर्माण करून शरद पवारांना उत्तर देणं, राष्ट्रवादीचे राजकारण बाहेर काढणं- प्रदर्शन करणं, दुष्काळी परिस्थिती असताना स्वागत स्वीकारणं यात उपमुख्यमंत्री अजित पवार गुंतलेले आहे. अजित पवार यांना शेतकऱ्यांच्या समस्या माहीत आहेत, तरी असे वागतात हे दुर्देवी आहे, असं त्यांनी (Ambadas Danve) म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 'विश्वगुरु'नं...; अंबादास दानवेंचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर
  2. Ambadas Danve Reaction On Kirit Somaiya Notice: व्हायरल व्हिडिओ क्लिपचे प्रकरण वाढणार? किरीट सोमैय्यांची अंबादास दानवेंना नोटीस
  3. Devendra Fadnavis With Ajit Pawar : 'आधी अजितदादा पिसिंग-पिसिंग अन् आता...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.