मुंबई : राज्यात नाट्यमय सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. यादरम्यान अनेक घडामोडी झाल्या न भूतो न भविष्य तो असा इतिहास रचला गेला व हे सर्व होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभे होते. असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अमृत पुष्प या अमित शहा यांच्या जीवनावर आधारित आचार्य पवन त्रिपाठी यांनी संकलित केलेल्या विचार पुष्प या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले यावेळी फडणवीस (devendra Fadanvis statement) चांनी हे वक्तव्य केले होते.
भाजपवर टीका : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केले 40 पेक्षा जास्त आमदार फोडुन आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा केला. आणि भाजप सोबत सरकार स्थापन केले. शिंदे फडणविसांचे सरकार स्थापन झाले आणि महाविकास आघाडीला सत्तेतुन बाहेर पडावे लागले. शिंदेंच्या बंडामागे भाजपच आहे. त्यांनीच हा प्रकार घडवल्याचे आरोप भाजप वर होत होते. सुरत मार्गे गुवाहाटी येथे पंचतारांकीत हाॅटेल मधे या आमदारांची सोय करण्यात आली होती. हा खर्च कोणी केला हा सवाल करत या फुटीर आमदारांना वेगळे लाभ दिल्याचे जाहीर आरोप होत आहेत. सत्तांतर नाट्यावर न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. या सगळ्या प्रक्रियेत भाजप वर होणाऱ्या आरोपांतील सत्य बाजुची कबुलीच फडणविसांनी दिल्याचे मानले जात आहे.
भाजपाचा खरा चेहरा उघड : राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यात भाजपाने सुरुवातीला मौन बाळगले होते. आपला या प्रकाराची काहीही संबंध नाही, हे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करत होते. मात्र भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता जाहीरपणे कबुली दिली आहे की, या सर्व सत्तांतराच्या खेळात अमित शहा हेच मुख्य सूत्रधार होते. त्यांच्या ताकदीवरच हा खेळ झाला. तसेच बच्चू कडू यांना आपण फोन करून आम्हाला सत्ता स्थापन करायचे आ.हे तुम्ही सोबत जा असे, सांगितल्याचेही फडणवीस यांनी कबूल केले आहे. एकूणच या सगळ्या प्रकारांमध्ये भाजपचे घाणेरडे राजकारण होते. हे आता उघड झाले आहे. भारतीय जनता पार्टी ही पक्षांमध्ये भांडण लावून पक्षांमध्ये फूट पाडून आपली पोळी भाजण्यात धन्यता मानते. हे पुन्हा एकदा या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. मात्र जनता यांना माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका : फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही सत्तांतराच्या मागे भारतीय जनता पक्षच होता हे स्पष्ट झाल्याचे म्हणले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण (YNC President Surej Chavan) यांनी हा आरोप केला, राज्यामध्ये सत्तांतर नाट्य घडत असताना या प्रकरणाची भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध (Reaction On Devendra Fadanvis Statement) नाही. जे काही सुरू आहे ते शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे सुरू आहे, असे सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत होते. मात्र आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप आणि अमित शहा हे या सर्वांच्या मागे असल्याचे वक्तव्य केल्याने भाजप मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे असे (Amit Shah Support to gov change) त्यांनी म्हणले.