ETV Bharat / state

Amarinder Singh Reaction On Governor : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?; कॅप्टन म्हाणाले, मला काहीही... - Amarinder Singh Reaction On Governor

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवले जाण्याची चर्चा सध्या महाराष्ट्रापासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. यावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. मला याबद्दल काहीच माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडायला तयार आहे असे ते म्हणाले.

Maharashtra New Governor Post
Amarinder Singh Reaction On MaharashtraGovernor
author img

By

Published : Jan 27, 2023, 5:26 PM IST

Updated : Feb 2, 2023, 5:58 PM IST

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरच राज्यामध्ये राज्यपाल बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली होती. हिवाळी अधिवेशनातही राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलने केली. त्यानंतर राज्यपाल बदलले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

  • It's purely speculative. Nobody has contacted me. I know nothing about it. Nobody has mentioned anything. I had told PM earlier, I am at his disposal wherever he wants me to be: BJP leader & ex-Punjab CM Capt Amarinder Singh on speculations of him being made Maharashtra Governor pic.twitter.com/w6dve6Q7Be

    — ANI (@ANI) February 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमरिंदर सिंग यांची प्रतिक्रिया - माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. मला याबद्दल काहीच माहिती नाही. कोणीही काहीही नमूद केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

अमरिंदर सिंग नवे राज्यपाल? : कोश्यारी यांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवले जाण्याची चर्चा आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे जवळपास नऊ वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी पंजाब विधानसभा विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.

भाजपशी युती : अमरिंदर सिंग त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती केली होती. मात्र या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आले होते. काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर अमरिंदर सिंग हे भारतीय जनता पक्षात जातील अशा चर्चादेखील त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र अमरिंदर सिंग यांनी आपला स्वतःचा पक्ष काढून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करून टाकला होता.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा परिचय : 1942 साली पंजाबच्या पटियाला शहरात अमरिंदर सिंग यांचा जन्म झाला होता. 1963 साली त्यांनी भारतीय आर्मी जॉईन केली होती. 1965 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग होता. अमरिंदर सिंग यांनी आपल्या राजकीय काँग्रेस पक्षासोबत काम केले आहे. त्यांच्या 52 वर्षाच्या राजकीय प्रवासात त्यांनी काँग्रेसमध्ये 42 वर्ष काम केले. यामध्ये ते दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1977 ला त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम करायला सुरुवात केली त्यावेळी ते लोकसभेवर पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय : ऑपरेशन ब्लू स्टार नंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोबत काम करायला सुरुवात केली. 1999 ते 2002 या काळात ते पंजाब काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अरुण जेटली यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2010 ते 2013 आणि 2015 ते 2017 ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 2002 ते 2007 साली त्यांनी भारतीय जनता पक्ष, अकाली दल यांची सत्ता मोडत पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन केली होती.

पहिल्यांदा मुख्यमंत्री : 2007 साली ते पंजाबचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. तसेच 2017 साली ते दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 18 सप्टेंबर 2021 आली त्यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला होता. त्यांनतर त्यांनी स्वत:ता पक्ष स्थापन करीत पंजाब विधानसभा निवडणुक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे.

हेही वाचा - Bawankule On Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांचेच कारस्थान, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Last Updated : Feb 2, 2023, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.