मुंबई - रझा अकादमीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये मुस्लिमांना राजभवन मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात एक पत्र लिहिले होते. ज्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले होते. भाजपने देखील या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वाने धार्मिक स्थळे उघडली आहेत. यातच रझा अकादमीने केलेल्या मागणीनंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
राजभवनातील मशिदीमध्ये नमाज पडण्याची परवानगी द्या- रझा अकादमीची मागणी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुस्लिमांना राजभवन मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रझा अकादमीने केली आहे.