मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी सेनेच्या सर्व आमदारांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा पूर्ण झाली आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित निर्णय घेऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
हेही वाचा - दोन दिवसात अंतिम निर्णय समजेल, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या चर्चेविषयी आमदारांना सांगण्यात आले. शिवसेनेची पुढील भूमिका काय आहे, याबाबत देखील चर्चा करण्यात आली. सेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतीस 'द ललित' या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.