मुंबई- देशात कॅब आणि एनआरसी कायद्या विरोधात जनवातावरण ढवळून निघाले आहे. ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शहरातही काल नाताळ सणाच्या दिवशी सदर कायद्यांविरुद्ध आंदोलन झाले. सांताक्रूझ येथील पालिकेच्या लायन्स म्युनिसिपल चिल्ड्रन पार्कमध्ये सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत एक दिवसीय उपोषण केले.
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सांताक्रूझ येथील पालिकेच्या लायन्स म्युनिसिपल चिल्ड्रन पार्कमध्ये नागरिकांनी उपोषण केले होते. काल सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे उपोषण सुरू होते. यात नागरिकांनी अन्न आणि पाण्याचे त्याग केले. यावेळी सीएए आणि एनआरसी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
हेही वाचा- ख्रिसमसनिमित्त अस्सल पदार्थांची मेजवानी