ETV Bharat / state

चेकनाक्यावर लाच मागणाऱ्यांना आवरा, पालिका आयुक्तांकडे मालवाहतूकदांराची तक्रार

author img

By

Published : May 6, 2021, 3:40 PM IST

'कोरोना काळातही मालवाहतूक ट्रक अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. पण, मुलुंड चेकनाक्यावर पालिका अधिकारी-कर्मचारी मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाची अडवणूक करत आहेत. पोलिसांची भीती दाखवून पैसे उकळत आहेत', असा आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेने केला आहे.

mumbai
मुंबई

मुंबई - कोरोना महामारीच्या काळात स्वतःची आणि कुटुंबियांची पर्वा न करता अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, म्हणून चालक अहोरात्र मालवाहूतक ट्रक चालवत आहेत. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून वाहनांची अडवणूक केली जात आहे. वाहतूकदारांकडे चेकनाक्यावर लाच मागितली जात असल्याचा आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदारांच्या शिखर संघटनेने केला आहे. तशी तक्रारही संघटनेने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे.

चेकनाक्यावर लाच मागणाऱ्यांना आवरा, पालिका आयुक्तांकडे मालवाहतूकदांराची तक्रार

पालिकांकडून मालवाहतूकदारांना त्रास

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी सांगितले, की 'कोरोना काळात देशभरात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून गेल्या वर्षीपासून रस्त्यावर मालवाहतूक ट्रक धावत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आम्हाला मालवाहतूकदार आणि ट्र्क चालकांकडून अनेक तक्ररी येत आहे. मुलुंड चेकनाक्यावर मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांसह इतर यंत्रणांमधील कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक व मालवाहतूक वाहनांची अडवणूक करत आहेत. तसेच, मालवाहतूक वाहन चालकांकडे चेकनाक्यावर आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट मागितला जात आहे. रिपोर्ट नसेल, तर पैसे मागतात. पैसे दिले नाही तर पोलिसांची भीती दाखवत असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांमुळे वाहतूकदारांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भेदरलेले काही चालक गावाकडे जाण्याची चर्चा करू लागले आहेत. त्याचा परिणाम नक्कीच मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होईल'.

संघटनेचे आयुक्तांना पत्र
संघटनेचे आयुक्तांना पत्र

मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांकडे तक्रार

'चालक औषधांसह अत्यावश्यक वस्तूंच्या मालाची वाहतूक जोखीम पत्करून करत आहेत. मात्र अशा मालवाहतूक वाहनांच्या चालकांकडे चेकनाक्यावर आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट मागितला जात आहे. तसेच रिपोर्ट नसेल, तर हफ्ते मागितले जात आहेत. याबाबत आम्ही संघटनेकडून मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली आहे. आयुक्तांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबतचे पत्रही लिहिले आहे.', असे संघटनेचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - वडिलांचे झाले कोरोनाने निधन, मुलीने पेटत्या चितेत घेतली उडी

हेही वाचा - नाशिकमध्ये आईचा कोरोनाने मृत्यू, तरुणीने कोव्हिड सेंटरमध्येच सॅनिटायझर घेऊन केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.