मुंबई - सध्या रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू आहेत. मात्र, आता राज्य सरकारने रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना लॉकडाऊनमध्ये अच्छे दिन येणार आहेत. सरकारच्या आदेशानंतर सकाळी-सकाळी तळीरामांनी दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे.
राज्य सरकारने रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिली.
सोशल डिस्टनसिंगचे पालन करत चेहऱ्याला मास्क लावत तळीरामांनी मद्याच्या दुकानांवर दुकान उघडण्यागोदर रांगा लावल्या आहेत. प्रशासनाने सोशल डिस्टनसिंगचं पालन करा, गर्दी करू नका, असे आवाहन जनतेला केले होते. मात्र, 40 दिवसांपासून दारूची दुकाने बंद असल्याने तळीरामांनी वाईन शॉपबाहेर जमायला सुरुवात केली आहे. मागील 40 दिवस दुप्पट तिप्पट किंमत मोजून तळीराम मद्याचे सेवन करत होते. मात्र, आता सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमी आंनदी आहेत.