मुंबई : राम सेतू स्टार अक्षय कुमार ( Ram Setu star Akshay Kumar ) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या पुढील 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार ( Akshay play role of Chhatrapati Shivaji Maharaj ) आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात'ची निर्मिती वसीम कुरेशी यांनी केली आहे. इतिहासाच्या सर्वात गौरवशाली पानांपैकी एक लिहून शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे एकमेव ध्येय असलेल्या सात शूर योद्ध्यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.
आपल्या मराठी पदार्पणाबद्दल अक्षयने केली उत्सुकता व्यक्त : 'वेडात मराठे वीर दौडले सात' टीमने मुंबईत एक अपवादात्मक मुहूर्त साधला होता, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांनीही हजेरी लावली होती. आपल्या मराठी पदार्पणाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना अक्षय म्हणाला, माझ्यासाठी ही एक स्वप्नवत भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. जेव्हा राज सरांनी मला ही भूमिका साकारायला सांगितली तेव्हा मी थक्क झालो. ही भूमिका साकारताना मला खूप छान वाटत आहे आणि माझ्यासाठी ही एक स्वप्नवत भूमिका असणार आहे. तसेच, मी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे आणि हा एक अनुभव असणार आहे.
अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार : 'अंतिम: द फायनल ट्रुथ'चे दिग्दर्शक म्हणाले, वेदात मराठे वीर दौडले सात हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मी त्यावर गेली 7 वर्षे काम करत आहे, हा एक विषय आहे ज्यावर खूप लक्ष देण्याची आणि संशोधनाची गरज आहे. तो आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भव्य मराठी चित्रपट बनवला जाणार आहे आणि तो देशभरात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सर्वात शक्तिशाली हिंदू राजा, यांची कथा लोकांना कळावी अशी माझी इच्छा आहे. शिवाजीची भूमिका साकारण्यासाठी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे.
हा चित्रपट सुपरहिट होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : चित्रपट आणि टीमबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा चित्रपट सुपरहिट होईल, माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. बाळासाहेब ठाकरे हे मराठी सिनेरसिकांच्या पाठीशी उभे होते, राज ठाकरेही सिनेमाला सपोर्ट करत आहेत.
चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते : ध्येय वेडेच इतिहास घडवतात, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात ध्येय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे. त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यशासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.
डिसेंबर मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार सुरूवात : शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची केलेली बांधणी, उंचावरील तोफा, गडावरील पाणीसाठा हे काम दूरदृष्टीचे होते. हे वैभव पाहून रयतेचा राजा नजरेसमोर येतो. त्यांच्यावरील सर्वच चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला देखील रसिकांचा प्रतिसाद मिळेल. असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट कात टाकतोय असे सांगून हा चित्रपट देखील भव्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सात वीरांची भूमिका साकारणाऱ्या विराज मडके, जय बुधाने, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रवीण तरडे या कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. डिसेंबर मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून सन 2023 मध्ये दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज ठाकरे मुख्यमंत्री यांची चौथ्यांदा भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही चौथी सार्वजनिक भेट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार सांभाळल्यानंतर काही दिवसातच राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते त्यानंतर राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त ठेवलेल्या दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि आता चित्रपटाच्या शुभारंभवेळी पुन्हा हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत सातत्याने राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र येत असल्याने राज्यात नवीन युतीची समीकरण जोडली जाणार आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळातील सुरू झाली आहे.