ETV Bharat / state

Bigg Boss Marathi Season 4 : अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी ४चा विजेता, अपूर्वा नेमळेकरला उपविजेतापदावर मानावे लागले समाधान

बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा अखेर पार पडला. ( bigg boss marathi ) यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यावेळी बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. (bigg boss marathi 4 ) बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला. (Akshay Kelkar Winner ) तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. (bigg boss marathi season 4 winner )

Bigg Boss Marathi Season 4
अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी ४चा विजेता
author img

By

Published : Jan 9, 2023, 7:29 AM IST

अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी ४चा विजेता

मुंबई : एडेमॉल या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या बिग ब्रदरचा भारतीय अवतार म्हणजे बिग बॉस. ( bigg boss marathi ) हिंदीत त्याला यश मिळाल्यावर तो इतर भारतीय भाषांमधूनही रंगू लागला. मराठी बिग बॉसचा चौथा सिझन नुकताच संपला. ( Apoorva Nemalekar is runner up) बिग बॉस मराठी सिझन फोर महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता मिळाला. यात अक्षय केळकर ठरला विजेता. ( bigg boss marathi season 4 winner )

बिग बॉस मराठी ४च्या पर्वाचा झाला समारोप : ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४ च्या पर्वाचा ८ जानेवारी रोजी समारोप झाला. या महाअंतिम सोहळ्याची स्पर्धा अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने यांच्यामध्ये रंगली. या स्पर्धकांमधून ज्याने सर्वाधिक मते मिळवली त्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरल आहे. बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास संपला. १९ सदस्यांमधून बिग बॉस मराठीच्या ( winner of Bigg Boss Marathi season 4 ) घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली.

१५ लाख ५५ हजार इतकी धनराशी : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने पटकावले दुसरे स्थान. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर. खेळाडूवृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी अक्षय केळकरला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला.

शिताफीने त्याने हा खेळ पूर्ण केला : अक्षय केळकर बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता झाला आणि त्या लखलखणाऱ्या ट्रॉफीवर त्याने आपले नाव कोरले. अक्षय केळकर विजेता होईल असे अनेकांचे मत होते, कारण अत्यंत हुशारी आणि शिताफीने त्याने आपले डाव टाकत हा खेळ पूर्ण केला आणि विजयी झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. अक्षयला विजेतेपदासह 15 लाख 55 हजार रक्कम मिळाली आहे.

अक्षय केळकर कोण आहे ? अक्षयने 2013 साली 'बे दुने दहा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'कमला' मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने 'प्रेमसाथी' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'कॉलेज कॅफे' या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. सब टीव्हीच्या 'भाखरवडी' या हिंदी मालिकेतदेखील त्याने काम केले आहे. विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट लिहिली आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने लिहिले आहे, हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालो. अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.