ETV Bharat / state

सेलिब्रिटींना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या अकबर चौकटला एनसीपीकडून अटक - ncb latest news

अकबर चौकटवर या अगोदरही अनेक गंभीर गुन्हे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे दाखल आहेत. एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकबर याला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात एमडी हे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेले आहे.

अकबर चौकट
अकबर चौकट
author img

By

Published : Feb 24, 2021, 7:32 PM IST

Updated : Feb 24, 2021, 8:00 PM IST

मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत सुरू असलेल्या अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाई केली जात असताना मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटी, टीव्ही कलाकारांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचं नाव अकबर चौकट अस असून त्यास मुंबईतील अंधेरी भागातून अटक करण्यात आलेली आहे.

बॉलिवूड कलाकारांना आमली पदार्थांचा पुरवठा

अकबर चौकटवर या अगोदरही अनेक गंभीर गुन्हे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे दाखल आहेत. एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकबर याला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात एमडी हे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेले आहे. मुंबईतील बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी , मॉडेल व टीव्ही कलाकारांना गेल्या काही वर्षांपासून अकबर चौकटच अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मुंबई विमानतळावर एनसीबीने जप्त केले नऊ कोटींचे हेरॉईन
दरम्यान काही दिवसांपूर्वी एनसीबीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ कोटी रुपयांचे ३ किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी साउथ आफ्रिकन नागरिक असलेल्या खानसिले प्रॉमिस शोखाली या महिलेला अटक करण्यात आली होती. एनसीबीला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून सदरची अटक आरोपी महिला हे जोहान्सबर्ग येथून कतार एअर वेजच्या विमानाने मुंबईत दाखल झाली होती. या महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिच्याकडे 9 कोटी रुपयांचे ३ किलो हेरॉइन मिळाले आहे. अटक करण्यात आलेले एक महिलेने ग्रे कलरच्या ट्रॉली बॅगमध्ये सदरचे अंमली पदार्थ लपून मुंबईतल्या विमानतळावर उतरली होती. या बरोबरच या अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीकडून एनसीबीने १५००० साउथ आफ्रिकन रँड हे चलन जप्त केले आहे.

Last Updated : Feb 24, 2021, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.