ETV Bharat / state

'शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीपैकी 15 हजार कोटी सरकार भरणार, विलंब आकार माफ'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना वीज थकबाकीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. याव्यतिरिक्त पवार यांनी पेट्रोल दरवाढ, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद, एल्गार परिषद, मतदान प्रक्रिया, अर्थसंकल्प आणि गुटखाबंदी या विषयांवरही संवाद साधला.

अजित पवार लेटेस्ट न्यूज
अजित पवार लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Feb 4, 2021, 2:35 PM IST

Updated : Feb 4, 2021, 5:09 PM IST

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनता दरबारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी वीज थकबाकीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. 'शेतकऱ्यांची 45 हजार कोटी थकबाकी होती. शेतकऱ्यांनी आता फक्त 15 हजार कोटी भरायचे आहेत. 15 हजार कोटींचा विलंब आकार माफ करण्यात आला आहे. 15 हजार कोटी सरकार भरणार आहे,' असे पवार म्हणाले.

याव्यतिरिक्त पवार यांनी पेट्रोल दरवाढ, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद, एल्गार परिषद, मतदान प्रक्रिया, अर्थसंकल्प आणि गुटखाबंदी या विषयांवरही संवाद साधला.

शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीपैकी 15 हजार कोटी सरकार भरणार - पवार

हेही वाचा - रायगड : खालापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यातील बोकड झाले गायब?

'अहिंसेच्या मार्गाने आंदोलक शेतकऱ्यांना भेटणाऱ्याला रोखू नये'

अहिंसेच्या मार्गाने जर कोणी आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार असेल तर त्यांना रोखण्यात येऊ नये. सुप्रिया सुळे ह्या आमच्या खासदार आहेत. त्यांना आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला दिले गेले पाहिजे. जर कोणी आपल्या भाषणातून भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्यांना रोखायलाही हवे, असे मत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षातील खासदार पोहचले असता, त्यांना आधी पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, आपण पाकिस्तान आणि चीन सीमेवरदेखील अशी कडेकोट व्यवस्था पहिली नसून केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून काढण्यासाठी केंद्र सरकारने असा बंदोबस्त केला आल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून आंदोलक शेतकऱ्यांसाठी पाणीदेखील आंदोलनस्थळी जाऊ दिले जात नाही आहे. तसेच, तिकडची वीज खंडित करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आल्यामुळे केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही गाजीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती.

Last Updated : Feb 4, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.