ETV Bharat / state

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी;जयंत पाटील नवे पक्षनेते - NCP latest news

राज्यातील राजकीय भूकंपानंतर, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. पक्षाने ३० ऑक्टोबरला अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड केली होती. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. हे पक्षाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत नाही, असे कारण देत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक
author img

By

Published : Nov 23, 2019, 9:56 PM IST

मुंबई - अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा ठराव पारीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधीमंडळ नेतेपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. तसेच, पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहेत.

ncp
राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक

हेही वाचा - महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर नेत्यांचा 'शायराना अंदाज'...

राज्यातील राजकीय भूकंपानंतर, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. पक्षाने ३० ऑक्टोबरला अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड केली होती. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. हे पक्षाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत नाही, असे कारण देत हा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच अजित पवार यांच्याकडे असलेले व्हिप बजावण्याचे अधिकारदेखील रद्द करण्यात आले आहेत.

Intro:अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदाची निवड रद्द.जयंत पाटील यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी

mh-mum-01-ncp-mitting-7201153

मुंबई, ता. २३

- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदाची निवड रद्दबातल करतानाच सर्व अधिकार काढण्याचा ठराव करण्यात आला असून पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्याचा ठराव करण्यात आला आहे
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडली.
पक्षाने ३० ऑक्टोबर २०१९ रोजी अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. ते पक्षाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत नाही. अजित पवार यांच्याकडे असलेले २३ नोव्हेंबरपासूनचे व्हिप बजावण्याचे अधिकार रद्दबातल करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचे सर्व संविधानिक अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना देण्याचा ठरावही करण्यात आला आहे.Body:अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदाची निवड रद्द.जयंत पाटील यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.