मुंबई : मला विरोधी पक्षनेतेपदात रस नाही, मला संघटनेत कोणतेही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेत कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील हे गेल्या पाच वर्षापासून प्रदेशाध्यक्षपदी असल्याचे सांगितल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या : अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षानी मला संघटनेत पद द्यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पक्ष जे पद मला देईल त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे अजित पवार म्हणाले. मागील पाच वर्षापासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. दर ३ वर्षांनी पक्षातील नेत्यांच्या पदात बदल केला जाते. त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्यावर शरद पवार काय भूमिका घेतात याकडे राज्यसह देशाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी वर्धापन दिनी दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती केली. नवीन कार्यकारी अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करुन त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज झाल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. त्यानंतर स्वत: शरद पवारांनी कार्यपद्धतीची घोषणा करताना अजित पवार नाराज नसल्याची घोषणा केली. दरम्यान अजित पवारांचा स्टेजवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पवार नाराज असल्याचे शरद पवार म्हणाले.
भाषणे देऊन पहिला क्रमांक मिळणार नाही : शिवाजी पार्कची सभा झाली तेव्हा आम्ही 35 ते 40 च्या दरम्यान होतो. तेव्हा आम्ही ज्युनियर म्हणून ओळखले जायचे. या काळात अनेकजण राष्ट्रवादीत आले आणि गेले. 25 वर्षांनी नवीन पिढी राष्ट्रवादी पक्षात येत आहे. पवारांनी मधेच भाकरी फिरवावी असे सांगितले होते. पक्षाने सर्वात लहान कार्यकर्त्याला चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. संधी मिळाल्यावर अनेकजण मंत्री होतात, मात्र, स्वत:शिवाय इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत. त्यांनी काम केले पाहिजे. त्यांना भाषणे देऊन पहिला क्रमांक मिळणार नाही. पण जे बोलतात त्यांनी काम स्वतः करावे, असा सल्ला अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांना दिला आहे.