ETV Bharat / state

चक्रीवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबा- अजित पवार

चक्रीवादळाचा जोर ओसरेपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी थांबून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Jun 3, 2020, 11:31 AM IST

मुंबई- अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे, असे अजित पवार यांनी सांगितले.

चक्रीवादळापासून जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाइफगार्ड, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत, असे पवार म्हणाले.

आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.